Google Wallet भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. मागील काही काळापासून याबाबत बातम्या सुरु होत्या. मात्र, आता ‘Google’ ने एका ब्लॉग पोस्टद्वारे भारतात Google Wallet च्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, हे Google Pay सारखे आहे, तर तसे नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, Google Wallet मध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गिफ्ट कार्ड इ. डिजिटल पद्धतीने स्टोअर करू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात सविस्तर माहिती-
हे सुद्धा वाचा: Google Pixel 8a भारतात AI फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत, उपलब्धता आणि Special ऑफर्स। Tech News
Google Wallet च्या वेबसाइटवरील FAQ नुसार, Google Wallet हे एक ‘सुरक्षित आणि खाजगी डिजिटल वॉलेट’ आहे जे वापरकर्त्यांना ॲपवर शेअर केलेल्या पेमेंट कार्ड, पास, तिकिटे, की किंवा ID वर जलद आणि सुलभ ऍक्सेस देईल. याव्यतिरिक्त, Google Pay वापरकर्त्यांना त्यांचे पैसे आणि ऑनलाइन व्यवहार मॅनेज करण्याची सुविधा देईल.
Google Wallet फक्त Android वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे. होय, आता भारतीय Android युजर्सनाही गुगल वॉलेट ऍक्सेस करता येणार आहे. अप्लिकेशन युजर्सना त्यांची खाजगी माहिती जसे की, स्टोअर कार्ड, तिकीट पास, ID इ. अधिक सुरक्षित ठेवण्याची परवानगी देईल.
मात्र, Google Wallet च्या रोलआउटचा त्याच्या आधीपासूनच लोकप्रिय UPI ॲप Google Pay वर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे गुगल प्ले स्टोअरवर लिस्ट देखील झाले होते. पण ऍप अद्याप भारतात लाँच केले गेले नाही, असे कंपनीने सांगितले होते.
मात्र, आता कंपनीने नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात आणि Google ब्लॉग पोस्टमध्ये वॉलेट लॉन्च केल्याची पुष्टी केली आहे. एवढेच नाही तर, Google India ने आपल्या अधिकृत X म्हणेजच ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
Samsung वॉलेटप्रमाणेच हे वॉलेट NFC म्हणजेच नियर फील्ड कम्युनिकेशनवर कार्य करेल. डेबिट आणि क्रेडिट कार्ड यात ऍड करण्यासह तुम्ही व्हर्च्युअल कार्ड सुद्धा बनवू शकता. याशिवाय वापरकर्ते गिफ्ट कार्ड, जिम मेंबरशिप, ऑनलाइन तिकीट, फ्लाइट तिकीट, रेल्वे तिकीट इ. वॉलेट ॲपमध्ये स्टोअर करून सुरक्षित ठेऊ शकता. त्याबरोबरच, तुम्ही बोर्डिंग पास, गिफ्ट कार्ड, लॉयल्टी कार्ड, इव्हेंट, कारची डिजिटल की, ॲक्सेस, ट्रान्झिट OTA इ. डिजिटली स्टोअर करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, Google Wallet वापरकर्त्याच्या Gmail खात्याशी आपोआप लिंक केले जाईल.