आता गुगल भारतातसुद्धा आपल्या ‘प्रोजेक्ट लून’ अंतर्गत इंटरनेटची सुविधा देणार आहे. सरकारने ह्या प्रोजेक्टला मंजूरी दिली आहे आणि आता असे वाटतय की, आपल्या देशातसुद्धा फुग्याच्या माध्यमातून सर्वांना इंटरनेट मिळेल. ह्या प्रोजेक्टमध्ये जमीनीपासून जवळपास २० किलोमीटर उंचावर एक फुगा लावला जाईल, ज्याच्या साहाय्याने त्याच्या आजूबाजला असलेलल्या सर्व परिसरात अगदी सहजपणे इंटरनेट पोहोचेल. ह्या प्रोजेक्टच्या येण्याने भारतातील जवळपास सर्व भागात इंटरनेट सुविधा मिळेल.
भारतामध्ये हा प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी गुगलने आपल्या देशातील सरकारकडून प्रोजेक्ट लून आणि ड्रोन आधारित इंटरनेट ट्रांन्समिशनची मंजूरी मागितली होती. जी आता मंजूर झाली आहे. त्याशिवाय गुगल पुढे जाऊ शकला नसता. ह्या देशात जसे न्यूझीलंड, कॅलिफोर्निया(अमेरिका) आणि ब्राझीलमध्ये ह्या टेक्नॉलॉजीचे परीक्षण आधीच केले गेले आहे. त्याचबरोबर गुगल भारतामध्ये ह्या प्रोजेक्टच्या परीक्षणासाठी सुरुवातीच्या काळात बीएसएनएलशी हातमिळवणी करु शकतो. हा प्रोजेक्ट स्वत:मध्ये इतका सक्षम आहे की, ह्याला स्थापन केल्यानंतर ४० ते ८० किलोमीटर भागात अगदी सहजपणे इंटरनेट पोहचेल. हा एक मोठा प्रोजेक्ट आहे जो कोणत्याही तारेशिवाय तुम्हाला इंटरनेट देईल. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, तुम्हाला आकाशातून इंटरनेट मिळेल.
ह्या प्रोजेक्ट सुरु झाल्यानंतर सरकार त्या भागातसुद्धा इंटरनेट पोहोचवेल जेथे हा पोहोचणे शक्य नाही. अगदी खेड्यापाड्यात इंटरनेट पोहोचण्यावर भर दिला जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मोबाईल टॉवर्समुळे रेेडिएशनचा धोका पोहोचतो अशा मोबाईल टॉवर्सची जागा हा अगदी सहजपणे घेईल. मात्र ही वेगळी गोष्ट आहे की, ह्या फुग्यामुळे रेेडिएशन पसरते की नाही, हे पडताळणे अजून बाकी आहे. ह्या प्रोजेक्टला गुगल संपुर्ण जगात लागू करण्याची योजना बनवत आहे आणि त्या माध्यमातून तो सर्वांना २४ तासांपर्यंत इंटरनेट देण्यासंबंधी बातचीत सुरु आहे.