Google Pixel Tab अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Updated on 11-May-2023
HIGHLIGHTS

Google I/O 2023 मध्ये कंपनीने जबरदस्त उपकरणे लाँच केली.

Google Pixel टॅब्लेट $ 499 मध्ये लाँच करण्यात आला.

यामध्ये गुगलचा टेन्सर 2 चिपसेट देण्यात आला आहे.

Google च्या Google I/O 2023 मध्ये कंपनीने जबरदस्त उपकरणे लाँच केली आहेत. या इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित Google Pixel 7 सिरीज स्मार्टफोन्सदेखील लाँच झाले आहेत. एवढेच नाही तर, Google Pixel Tab अखेर लॉन्च झाला आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Pixel 7 सिरीजसह हे सादर केले होते. हे डिव्हाइस 20 जून 2023 पासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 

Google Pixel Tab ची किमंत

Google Pixel टॅब्लेट $ 499 म्हणजेच सुमारे 41,000 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हे डिवाइस परदेशांमध्ये Google Store किंवा इतर किरकोळ स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते. लवकरच हा टॅब भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या पिक्सेल टॅबमध्ये 11-इंच डिस्प्ले स्क्रीन आहे. यामध्ये गुगलचा टेन्सर 2 चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये Android 13 सपोर्ट करण्यात आला आहे. यासोबत, गुगलने काही ऍप्स चांगल्या परफॉर्मन्ससाठी ऑप्टिमाइझ केले आहेत. टॅब 8GB RAM / 128GB स्टोरेज आणि 8GB RAM / 256GB अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 

हे उपकरण चार्जिंग स्पीकर डॉकसह येते. याच्या मदतीने हा टॅबलेट स्मार्ट डिस्प्लेमध्ये बदलेल. यामध्ये तुम्हाला अनेक AI टूल्स मिळणार आहेत. यात 8 मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :