Google Pay and Aadhaar Update: आता पेमेंट सिस्टम होणार अधिक सोपे, वाचा डिटेल्स

Google Pay and Aadhaar Update: आता पेमेंट सिस्टम होणार अधिक सोपे, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

Google Pay आता UPI सक्रियतेसाठी आधार बेस्ड ऑथेंटिकेशनला समर्थन करतो.

UPI ऍक्टिव्हेशनसाठी खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा.

महत्त्वाचे म्हणजे हे फिचर सध्या निवडक बँकांच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे.

Google ने घोषणा केली आहे की, त्यांचे मोबाइल पेमेंट ऍप Google Pay आता UPI सक्रियतेसाठी आधार बेस्ड ऑथेंटिकेशनला समर्थन करतो. आता वापरकर्त्यांना NPCI द्वारे आधार वापरून UPI ​​साठी रजिस्टर करता येईल आणि डेबिट कार्डशिवाय त्यांचा UPI पिन सेट करता येईल.

UPI सक्रिय करण्यासाठी आधार कसे वापरायचे ? 

आधारद्वारे UPI सक्रिय करण्यासाठी, वापरकर्त्यांकडे UIDAI आणि बँकेत नोंदणीकृत समान फोन नंबर असणे आवश्यक आहे. तसेच, बँक खाते आधारशी जोडलेले असणे बंधनकारक आहे. 

UPI ऍक्टिव्हेशनसाठी खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा. 

– वापरकर्त्यांना Google Pay वर डेबिट कार्ड आणि आधार-आधारित UPI ऑनबोर्डिंग यापैकी निवडण्याचा पर्याय मिळेल.

– आधार निवडल्यानंतर, वापरकर्त्यांना त्यांच्या आधार कार्डचे पहिले 6 अंक भरावे लागतील.

– आता वापरकर्त्यांना UIDAI आणि त्यांच्या बँकेकडून प्राप्त झालेले OTP टाकावे लागेल. 

– यानंतर तुमची बँक या प्रक्रियेला पूर्ण करेल आणि त्यानंतर तुम्ही UPI पिन सेट करू शकता.

– यानंतर ग्राहक Google Payच्या मदतीने व्यवहार करू शकता आणि बॅलेन्स देखील चेक करू शकता.

महत्त्वाचे :

महत्त्वाचे म्हणजे हे फिचर सध्या निवडक बँकांच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. इतर बँका लवकरच त्याचे अनुकरण करतील, असे देखील कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे हे नवीन फंक्शन अनेक वापरकर्त्यांना UPI आयडी सेट करण्यास आणि डिजिटल पेमेंट करण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे. गुगलने म्हटले आहे की, ''UPI वर आधार-आधारित ऑनबोर्डिंगची सुविधा वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे."

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo