Google Pay ने आपल्या वापरकर्त्यांसाठी दिवाळी धमाका ऑफर आणली आहे.
Google Pay ने आपल्या वापरकर्त्यांसाठी 'Laddoos' नावाची दिवाळी मोहीम सुरू केली आहे.
वापरकर्त्यांना Laddoos कॅम्पेनद्वारे 51 रुपयांपासून ते 1,001 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.
दिवाळीत सर्व कंपन्या नवनवीन ऑफर्स सादर करून अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यात Google Pay ने सणासुदीच्या काळात आपल्या वापरकर्त्यांसाठी दिवाळी धमाका ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत Google Pay वापरकर्त्यांना 1,001 रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळत आहे. तुम्ही देखील Google Pay वापरकर्ते असाल तर ही दिवाळी ऑफर खास तुमच्यासाठी आहे. Google Pay ने आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘Laddoos’ नावाची दिवाळी मोहीम सुरू केली आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Google Pay वापरकर्त्यांना ‘Laddoos’ ऑफरअंतर्गत 1,001 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी मिळत आहे. या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त Google Pay द्वारे काही व्यवहार करावे लागतील. तुम्ही असेही सामान्य दिवसांमध्ये दररोज आणि सातत्याने Google Pay द्वारे अनेक छोटे-मोठे व्यवहार करू शकता. आता तुम्हाला या व्यवहारांवर 1,001 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे.
Laddoos कॅशबॅक ऑफर
साइटनुसार, वापरकर्त्यांना Laddoos कॅम्पेनद्वारे 51 रुपयांपासून ते 1,001 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. या कॅशबॅकसाठी वापरकर्त्यांना 6 लाडू जमा करावे लागतील. हे 6 लाडू गोळा करण्यासाठी तुम्हाला Google Pay वर काही कार्ये पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. लाडू गोळा केल्यानंतर तुम्हाला 1,001 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे लाडू तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही भेट देऊ शकता. जर तुमच्या मित्रांपैकी कोणी तुम्हाला लाडू भेट देत असेल तर तुम्हाला पुढील कार्ये पूर्ण करण्याची गरज नाही. कार्य पुढीलप्रमाणे:
UPI द्वारे स्कॅन करून कोणत्याही व्यापाऱ्याला किमान 100 रुपये पेमेंट करा.
UPI द्वारे कोणत्याही प्रीपेड किंवा पोस्टपेड मोबाईल फोनवर 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करा.
UPI द्वारे किमान 3000 रुपयांचे बिल पेमेंट करा.
तसेच, पार्टनर ब्रँडकडून किमान 200 रुपयांचे गिफ्ट कार्ड खरेदी करा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.