आता AI ऍप करेल जगभरातील मछरांचा खात्मा

Updated on 09-Jan-2019
HIGHLIGHTS

तुम्ही एका अश्या दुनियेचा विचार करू शकता का ज्यात एकही मच्छर नसेल? येत्या काही दिवसांत असेच काहीसे होऊ शकते. गूगल ची पॅरेन्ट कंपनी Alphabet Ink ने जगातील मच्छरांचा खात्मा करण्याची जबाबदारी घेतील आहे.

महत्वाचे मद्दे:

  • मच्छरच्या जवळपास 3500 प्रजाती आहेत
  • Fresno County, California मध्ये होतील ट्रायल
  • AI ऍपची घेतली जाईल मदत

Google ची पॅरेन्ट कंपनी Alphabet सध्या मच्छरांमुळे होणाऱ्या आजारांवर काम करत आहे आणि सोबतच मच्छरांचा समूळ नाश करण्याची योजना पण बनवत आहे. कंपनी ने याची सुरवात Fresno County, California पासून केली आहे. कंपनीनुसार जर हा ट्रायल प्रोजेक्ट यशस्वी झाला तर हा इतर ठिकाणी पण हि पद्धत वापरली जाईल. Verily Life Sciences, जी Alphabet ची एक रिसर्च आर्गेनाइजेशन आहे, तिने हा प्रोजेक्ट हातात घेतला आहे. यशस्वी ट्रायल नंतर Google दुसऱ्या ठिकाणी जिथे डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका सारखे आजार मच्छरांमुळे होतात आणि लोक मृत्युमुखी पडतात, तिथे हि टेक्नॉलॉजी वापरली जाईल.

Life science शी जोडलेल्या अनेक कंपन्या पण या प्रोजेक्ट वर काम करत आहेत. Alphabet Ink एका स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्सच्या मदतीने या कामाला सुरवात करण्याचा विचार करत आहे. तसेच या प्रोसेस मध्ये कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ऍप्‍लीकेशनची मदत पण घेईल. मछरांमुळे जगभरात दररोज अनेक लोक मारतात. रिपोर्ट्स नुसार मच्छरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे जगभरात दरवर्षी जवळपास 10 लाख लोक मारतात. समुपर्ण जगात मच्छरच्या जवळपास 3500 प्रजाती आहेत.

कॅलिफोर्निया मधील वैज्ञानिकांनी याची जोरदार तयारी सुरु केली आहे. गूगलची पॅरेन्ट कंपनी 'अल्‍फाबेट इंक' जगभरातील मच्छरांमुळे होणारे आजार थांबवण्यासाठी असे काही करण्याची हि पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्ट साठी Google ने एक 'हेल्थ चीफ एक्जीक्यूटिव' पण ठेवला आहे जेणेकरून यावर अजून चांगल्यापद्धतीने काम केले जाऊ शकेल आणि प्रत्येक छोटी गोष्ट समोर येईल.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :