डिजिटल असिसटेंट फीचर गुगल नाऊला मिळाले नवीन अपडेट

Updated on 14-Dec-2015
HIGHLIGHTS

ह्या नवीन अपडेटची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे आपल्याद्वारे सर्च केल्या गेलेल्या प्रोडक्टला ट्रॅक करतो आणि त्याच्याशी संबंधित असलेली माहिती उपलब्ध करुन देतो. त्याचबरोबर जर त्या प्रोडक्टच्या किंमतीत घट झाली असेल, तर गुगल नाऊ त्याबाबत नोटिफिकेशनसुद्धा देईल.

गुगलने प्रत्येक वेळेला आपल्या प्रोडक्ट्समध्ये काही ना काही बदल केले आहेत अन्यथा करत आहे. ह्यावेळीसुद्धा गुगलने आपल्या डिजिटल असिसटेंट फीचर गुगल नाऊला नवीन अपडेटसह सादर केले आहे. ह्या नवीन अपडेटमुळे आता डिजिटल असिसटेंट फीचर गुगल नाऊ आता आणखी जास्त चांगला झाला आहे. ह्या नवीन अपडेटनंतर यूजर्स सर्व अपडेटची माहिती प्राप्त करु शकतात.

आता नवीन अपडेटनंतर डिजिटल असिसटेंट फीचर गुगल नाऊमध्ये मेसेज वाचणे आणि त्याचा रिप्लाय करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर गुगल नाऊमध्ये अजून एक फीचर जोडला गेला आहे. नवीन अपडेटनंतर सर्च केल्या गेलेल्या प्रोडक्टला ट्रॅक करतात आणि त्याच्या किंमतीत घट झाल्यानंतर अपडेटसुद्धा देतात.

नवीन अपडेटची खास गोष्ट म्हणजे हा आपल्याद्वारे सर्च केल्या गेलेल्या प्रोडक्टला ट्रॅक करतो आणि त्याच्याशी संबंधित असलेली माहिती उपलब्ध करुन देतो. त्याचबरोबर जर त्या प्रोडक्टच्या किंमतीत घट झाली असेल, तर गुगल नाऊ त्याबाबत नोटिफिकेशनसुद्धा देईल, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या आवडीच्या प्रोडक्टला कमी किंमतीत खरेदी करु शकता.

गुगल नाऊ केवळ आपल्याद्वारे भेट दिल्या गेलेल्या शॉपिंग साइटच्या किंमतीलाच ट्रॅक करेल.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :