एका लांब कालावधीनंतर, Google ने Google Maps साठी Google Street View फीचर लाँच केले आहे. गुगल स्ट्रीट व्ह्यूच्या मदतीने युजर्सना गुगल मॅप्समध्ये पॅनोरॅमिक किंवा सोप्या शब्दात 360 डिग्री मॅप्स पाहता येतील. 2016 मध्ये Google Maps चे Street View फिचर जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले होते. त्यानंतर आता 6 वर्षांनंतर ते भारतासह अनेक देशांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. Google ने भारतातील Street View मॅप्ससाठी Genesys आणि Tech Mahindra सोबत भागीदारी केली आहे.
हे सुद्धा वाचा : AKAI : मॅजिक रिमोट आणि व्हॉइस कंट्रोलसह परवडणारा 4K स्मार्ट टीव्ही, मिळेल थिएटर सारखा साउंड
नवीन फीचर लाँच केल्यावर Google ने सांगितले आहे की, Google Maps मधील Street View फिचरसाठी, 10 शहरांमधील 1,50,000 किमी रस्त्यांचे 360-डिग्री स्कॅनिंग केले गेले आहे. या वर्षाच्या अखेरीस 50 शहरांमध्ये ते केले जाईल. Google च्या भागीदारीत, Tech Mahindra ने महिंद्रा SUV कॅमेरे असलेली वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या 10 शहरांमध्ये बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदनगर आणि अमृतसर यांचा समावेश आहे.
त्याबरोबरच गुगलने सांगितले की, भारतातील स्ट्रीट व्ह्यूसाठी डेटा कलेक्शन भारतीय पार्टनरच्या मदतीने केले जाईल. Street View API देखील डेव्हलपर्ससाठी जारी केले जाईल. भारत हा पहिला देश आहे जिथे Google ने स्ट्रीट व्ह्यू डेटासाठी लोकल पार्टनरसोबत भागीदारी केली आहे.
Google चे Street View आधीपासूनच Google Earth मध्ये आहे आणि इतर देशांमध्ये देखील लाईव्ह आहे. स्ट्रीट व्ह्यूच्या मदतीने तुम्हाला एखाद्या ठिकाणाचा नकाशा त्याप्रकारे दिसेल, जसे की तुमची स्वतः त्या जागेवर उभे आहात. स्ट्रीट व्ह्यू विशिष्ट क्षेत्राच्या तापमानाची माहिती देखील प्रदान करेल. याशिवाय, नवीन अपडेटनंतर कोणत्याही रस्त्याची किंवा क्षेत्राची निश्चित स्पीड लिमिट देखील दिसेल.