मागच्या वर्षी US मध्ये जॉब सर्च लॉन्च केल्यानंतर आता Google ने भारतात हा फीचर सादर केला आहे. कंपनी नुसार, लोक आता गूगल सर्च बार च्या माध्यमातून सहज जॉब सर्च करू शकतील, ज्यामुळे काम अजून सोप्पे होईल.
Google च्या या नव्या मोहिमेत IBM टॅलेंट, मॅनेजमेंट सोल्यूशंस, लिंक्डइन, Quezx, QuikrJobs, शाइन.कॉम, T-जॉब्स, टाइम्सजॉब्स, विजडमजॉब्स, आसान जॉब्स आणि फ्रेशवर्ल्ड सह अनेक पार्टनर्स आहेत.
इंडिया आणि दक्षिण आशिया चे Google चे वाईस प्रेसिडेंट Rajan Anandan ने 2017 च्या शेवटच्या तिमाहीत सांगितले होते की "Google ने जॉब संबधित सर्च मध्ये 45% टक्क्यांपर्यंतची वाढ बघितली आहे. SME सर्वात जास्त नोकर्या निर्माण करताता पण नेहमीच आपली लिस्टिंग करण्यात असमर्थ असतात. आमच्या पार्टनर्स द्वारा संचालित हा नवीन जॉब सर्च एक्सपीरियंस आणि आमच्या ओपन प्लॅटफॉर्म अप्रोच ने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत."
यूजर्स स्मार्ट फिल्टर चा वापर करून रिजल्ट्स मिळवू शकतात किंवा लिस्ट सेव करू शकतात आणि शेयर करू शकतात आणि अलर्टस साठी एंड्राइड आणि iOS मध्ये सर्च अॅप वर साइन अप करू शकतात. तसेच डेस्कटॉप आणि मोबाईल फोन वर याच्या वापरासाठी गूगल सर्च वर साइन अप करू शकतात.