माणसापेक्षाही हुशार! Google ने लाँच केले नवीन Powerful AI मॉडेल Gemini, ChatGPT ची होणार का सुट्टी? Tech News

Updated on 07-Dec-2023
HIGHLIGHTS

Google ने नवीन AI मॉडेल 'Gemini' लाँच केले आहे.

हे AI मॉडेल Gemini 1.0 नॅनो, प्रो आणि अल्ट्रा तीन वेगवगेळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

नवे तंत्रज्ञान Google Bard आणि Pixel फोनवर आधीच उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा ट्रेंड काळानुसार वाढतच चालला आहे. OpenAI पासून Google पर्यंत अनेक मोठ्या कंपन्या या शर्यतीत सामील आहेत. आता Google प्रगत AI मॉडेल लाँच करून या क्षेत्रात आणखी पुढे जात आहे. Google ने नवीन AI मॉडेल ‘Gemini’ लाँच केले आहे. OpenAI च्या चॅटबॉट ChatGPT 4 ला टक्कर देण्यासाठी गुगलने Gemini सादर केले आहे, अशा चर्चा सुरु आहेत.

नवे तंत्रज्ञान Google Bard आणि Pixel फोनवर आधीच उपलब्ध करून देण्यात आले आहे. Google ने त्यांच्या पॅरेंट कंपनी Alphabet सोबत AI रिसर्च युनिट DeepMind सोबत ही टेक्नॉलॉजी तयार केली आहे. हे AI मॉडेल मल्टीमॉडेलसारखे आहे. सर्व डिटेल्स पुढे सविस्तर वाचा.

हे सुद्धा वाचा: आगामी Redmi Note 13 Pro+ 5G ची इंडिया लाँच कन्फर्म, 200MP कॅमेरासह भारतात होणार दाखल। Tech News

Google ने लाँच केले Gemini

Google चे CEO सुंदर पिचाई यांच्या मते, मानव जगाला कसे समजून घेतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात यावरून ने मॉडेल प्रेरित आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, Gemini 1.0. मॉडेल टेक्स्ट, फोटो, कोड आणि ऑडिओपर्यंत विविध प्रकारच्या डेटा आणि कार्यांशी सहज डील करू शकतो.

वर सांगितल्याप्रमाणे, हे AI मल्टीमॉडेल म्हणून डिझाइन केले आहे. म्हणजेच ते इतर प्रणालींवर अवलंबून न राहता विविध प्रकारची माहिती एकत्र करण्यास सक्षम असेल. Gemini 1.0 नॅनो, प्रो आणि अल्ट्रा तीन वेगवगेळ्या प्रकारांमध्ये येतो.

Gemini 1.0 Nano: नॅनो हे बेस व्हेरिएंट आहे, जो ऑन-डिवाइस टास्कसाठी उपलब्ध असेल. Google Pixel 8 Pro मध्ये नॅनो व्हेरिएंट उपलब्ध आहे.

Gemini 1.0 Pro: प्रो प्रीमियम आणि स्केलेबल आहे, जो बार्ड, सर्च, जाहिराती, Chrome आणि Duet AI सारख्या अनेक Google प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस साठी उपलब्ध आहे.

Gemini 1.0 Ultra: अल्ट्रा टॉप हा टॉप व्हेरियंट आहे, जो पुढील वर्षी निवडक ग्राहक, विकासक आणि भागीदारांसाठी उपलब्ध असेल.

कधी होणार लाँच?

Google ने Bard ची प्रगत आवृत्ती लाँच केली आहे, ज्यामध्ये Gemini Pro व्हेरिएंट अधिक चांगले ट्यून केलेले आहेत. ऍडव्हान्स बार्ड चॅटबॉट त्याच 170 देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध असेल, जेथे Bard सध्या उपलब्ध आहे. 2024 पर्यंत ते इतर ठिकाणी सुद्धा पोहोचेल. Gemini अल्ट्रा 2024 मध्ये उपलब्ध होईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :