Google for India: Gemini Liveसह तब्बल 9 भारतीय भाषांचे समर्थन! इतर नवे फीचर्स देखील जारी, वाचा सर्व डिटेल्स   

Google for India: Gemini Liveसह तब्बल 9 भारतीय भाषांचे समर्थन! इतर नवे फीचर्स देखील जारी, वाचा सर्व डिटेल्स   
HIGHLIGHTS

Google for India इव्हेंटमध्ये Google चे मोठे लक्ष Gemini सह AI वर आहे.

Gemini चे 40% हून अधिक भारतीय भाषा वापरकर्ते व्हॉइस इनपुट वापरतात.

Google Maps आता धुके आणि पुराबद्दल देखील सतर्क करेल.

आज Google for India इव्हेंटच्या 10व्या आवृत्तीत कंपनीने घोषणा केली की, 2024 मध्ये त्यांनी भारतात 20 वर्षांचे ऑपरेशन पूर्ण केले आहे. इव्हेंटमध्ये, Google चे मोठे लक्ष Gemini सह AI वर आहे. हे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात सक्षम AI मॉडेल आहे. Gemini चे 40% हून अधिक भारतीय भाषा वापरकर्ते व्हॉइस इनपुट वापरतात. त्यामुळे Google ने आज जाहीर केले आहे की, Gemini Live जे आधीपासून इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, ते आजपासून हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, आणखी 8 भारतीय भाषांचे सपोर्टसुद्धा लवकर मिळणार आहे. इव्हेंटमध्ये झालेल्या महत्त्वाच्या घोषणांबद्दल जाणून घेऊयात सविस्तर-

Also Read: Apple Diwali Offer 2024: सर्व प्रोडक्ट्सवर तब्बल 10,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक, iPhone सह इयरबड्स देखील Free!

Gemini Live सह 9 भारतीय भाषांचे समर्थन

Gemini मोबाइल ॲप, तुमचे Google वरील AI असिस्टंट भारतातील वापरकर्त्यांना शैक्षणिक मदत आणि सर्जनशील प्रेरणेपासून जटिल माहिती समजून घेण्यापर्यंत अनेक कार्ये हाताळण्यात मदत करत आहे. “प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या पसंतीच्या भाषेत कामे करावीत अशी आमची इच्छा आहे.”, असे Google India Blog वर माहिती दिली आहे.

google for india

पुढे ब्लॉगमध्ये सांगितले गेले आहे की, भारतात Gemini च्या 40% पेक्षा जास्त भारतीय भाषिक वापरकर्ते आधीपासूनच व्हॉइस इनपुटवर अवलंबून आहेत. त्याबरोबरच, आम्ही अलीकडेच तुमच्या फोनवर जेमिनीसोबत आणखी नैसर्गिक आणि मुक्त-प्रवाह व्हॉइस संभाषणांसाठी Gemini Live इंग्रजीमध्ये लाँच केले आहे. त्याचप्रमाणे, “आजपासून आम्ही Gemini Live हिंदीमध्ये आणत आहोत. ज्यामध्ये बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तेलुगू, तमिळ, उर्दू अशा आणखी 8 भारतीय भाषा आहेत. ज्याचे समर्थन तुम्हाला येत्या काही आठवड्यांत मिळेल.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Gemini Live रिअल-टाइममध्ये प्रतिसाद देते. तसेच, तुमच्या संभाषण शैलीशी जुळवून घेते आणि तुम्हाला इंटरप्ट करण्यास, फॉलो-अप प्रश्न विचारणे इ. साठी देखील अनुमती देते. याद्वारे तुम्हाला नवीन संकल्पना शिकण्यासाठी किंवा विचारमंथन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.

Google Lens Video Recognition Feature

गूगल फॉर इंडिया 2024 इव्हेंटमध्ये गूगलने आपल्या पॉपुलर ॲप गूगल लेन्ससाठी नवीन फीचर रोलआउट केले आहे. हे नाव Video Recognition फिचर आहे. या फीचरद्वारे यूजर्स आता गुगल लेन्समध्ये व्हिडिओ कॅप्चर करून त्याबद्दल माहिती घेऊ शकतील. यापूर्वी गुगल लेन्समध्ये फक्त फोटो शोधण्याची सुविधा उपलब्ध होती.

Google Search AI Overviews

गुगल सर्च देखील अपडेट करण्यात आले आहे, जेणेकरुन आता युजर्स बंगाली, मराठी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये सर्च करू शकतील. यामुळे वापरकर्त्यांना काहीही शोधणे आणि अधिक उत्तम परिणाम मिळणे, सोपे होईल. याचे समर्थन देखील येत्या काही दिवसांत मिळणार आहे.

Google Maps

Google Maps मध्ये Gemini च्या आगमनाने, आता AI ने तयार केलेल्या कोणत्याही हॉटेल आणि रेस्टॉरंटचे सारांशित पुनरावलोकने वाचता येतील. यासह, आपण रेटिंग देखील पाहण्यास सक्षम असाल. याद्वारे युजर्सना हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची सेवा कशी आहे, हे देखील समजेल. विशेष म्हणजे Google ने Google Maps मध्ये 2 नवीन रिअल-टाइम हवामानाशी संबंधित अपडेट्स देखील जोडली आहेत, ज्याद्वारे वापरकर्त्यांना रस्त्यांवर धुके आणि पूर येण्याबद्दल सतर्कता दिली जाईल. इव्हेंटबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo