स्वस्त फ्लाईट तिकीट बूक करण्यात मदत करेल Google, कसे आहे नवे फीचर?

स्वस्त फ्लाईट तिकीट बूक करण्यात मदत करेल Google, कसे आहे नवे फीचर?
HIGHLIGHTS

Google flights च्या मदतीने तिकीट बूक करा.

किंमत कमी झाल्यास मिळेल रीफंड

कोण करू शकतात या फिचारचा वापर?

तुम्ही देखील फ्लाईटने प्रवास करत असाल, तर आता महागडे तिकीट बूक करण्यासाठी खिशाला जास्त फटका बसणार नाही. Google ने आता हॉटेल आणि फ्लाईट तिकीट बुकिंग युजर्ससाठी सोपी बनवली आहे. एवढेच नाही तर तुम्ही Google flights च्या मदतीने फ्लाईट तिकिटांच्या किमतीची तुलना देखील करून बघू शकता. त्यामुळे आता "जीवन सफर करा मस्तीने". 

Google flights फीचर

तुम्ही बघितले असेल की, फ्लाईटच्या तिकिटांच्या किमती कमी जास्त होत असतात. अशा परिस्थितीत, Google आता Google flights प्राईस गॅरंटी फीचर घेऊन आला आहे. या फीचरबाबत कंपनीचा दावा आहे की, Google flights ne तिकीट बूक केल्यावर फ्लाईट तिकितची किंमत कमी झाल्यास, जेवढे अंतर असेल तेवढे पैसे तुम्हाला परत दिले जातील. हे फीचर सध्या अमेरीकेत युजर्ससाठी उपलब्ध आहे. 

हे फीचर फ्लाईट टेक ऑफपर्यंत तिकीट मॉनिटर करत असतो. दरम्यान, तिकीटाची किंमत कमी झाली तर, युजर्सना रीफंड मिळतो, अशी माहिती या फीचरबद्दल दिली गेली आहे. मात्र, हे फक्त त्या फ्लाईटसाठी आहेत, ज्यांची किंमत कमी होणार नाही असा Google ला विश्वास आहे. 

Google pay द्वारे रीफंड

याव्यतिरिक्त, जर दोन्ही तिकीट दरात 5 डॉलर पेक्षा कमी अंतर असेल, तर तुम्हाला रीफंड मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, रीफंड देण्यासाठी कंपनी Google pay चा वापर करेल. जर तुम्हीदेखील या सेवेचा लाभ घेण्याच्या विचार करत असाल तर Google pay अकाऊंट लगेच सेटअप करा. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo