GOOGLE : लवकरच येणार मोठे अपडेट, लगेच मिळेल हरवलेला फोन

GOOGLE : लवकरच येणार मोठे अपडेट, लगेच मिळेल हरवलेला फोन
HIGHLIGHTS

चुटकीसरशी मिळेल हरवलेला फोन

गुगल Find My Device फीचरमध्ये मिळेल अपडेट

लॅपटॉप विंडोजसाठी Near Buy शेअर फिचर

GOOGLE एका नवीन फिचरवर काम करत आहे. ज्याने तुमचा हरवलेला किंवा चोरी गेलेला फोन शोधणे सोपे होईल. गुगलच्या नवीन अपडेटसह स्मार्टफोन बंद असतानाही Find My Device फीचरद्वारे शोधता येईल. Apple AirTag सह ही सुविधा आधीच मिळतेय. या नव्या फीचरच्या मदतीने इंटरनेटशिवाय फोन अँड झाल्यानंतरही डिवाइस शोधण्यात मदत होईल. 

चुटकीसरशी मिळेल हरवलेला फोन 

गुगलच्या नवीन फिचरनंतर फोन बंद असतानाही फाईंड माय डिवाइसच्या मदतीने मिळेल. म्हणजेच दोन चोरीला गेल्यास आणि बंद झाल्यास युएजर्स त्याचे लोकेशन ट्रेस करू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार गुगलच्या पिक्सेल डिव्हाइसेसवर या फीचरला पिक्सेल पॉवर ऑफ फाईंडर म्हटले जाईल.  

नवे फिचर कसे काम करेल ? 

मिळालेल्या माहितीप्रमाणे, यासाठी नवीन हार्डवेअर ऍब्स्ट्रक्शन लेयर सोर्स कोडमध्ये सामील करण्यात आली आहे. अहवाल सांगतो की, प्रीकॉम्प्युटेड फिंगर नेटवर्क की डिव्हाइसच्या ब्लूटूथ चिपमध्ये हस्तांतरित केल्या जातील, जे फोन बंद असतानाही चिप सक्रिय राहण्यास मदत करतील. हे काम आयफोनच्या फाइंड माय डिवाइससारखे आहे.

Near Buy शेअर फिचर 

विंडोज लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी Google लवकरच Near Buy शेअर रिलीज करू शकतो. नियर बाय शेअरची ही आवृत्ती सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. निअर बाय शेअर ऍपच्या मदतीने बीटा वापरकर्ते त्यांच्या Android फोनवरून लॅपटॉपवर कोणतीही फाईल सहज शेअर करू शकतात. Nearby Share च्या मदतीने तुम्ही फोटो-व्हिडिओ किंवा कोणत्याही डॉक्युमेंटची मोठी फाईल फोनवरून कॉम्प्युटरवर शेअर करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo