Google Doodle: आज अशा प्रकारे KL Saigal यांचा 114वा जन्मदिन साजरा करत आहे Google
आज गूगल आपल्या डूडल ने रुपेरी पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक कुंदन लाल सैगल यांच्या 114व्या जन्मदिनी अशा प्रकारे आदरांजली देत आहे.
आज रुपेरी पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक कुंदन लाल सैगल यांचा 114वा जन्मदिवस आहे. या महान व्यक्तिच्या जन्मदिनी आज गूगल आपल्या डूडल च्या माध्यामातून आदरांजली देत आहे. सैगल यांना नैसर्गीक रित्या एक शानदार आवाज मिळाला होता आणि त्यांची गाणी गाण्याची शैली पण सर्वांपेक्षा वेगळी म्हणू शकतो. त्यामुळेच ते असे पहिले सुपरस्टार बनले होते, जे जगावेगळ्या प्रतिभेचे धनी होते.
आपल्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या रुपेरी पडद्यावरील करियर मध्ये अभिनेता-गायक म्हणून 36 चित्रपटातून लोकांन समोर आले होते,हे चित्रपट तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांनी 185 गाणी गायिली होती. सैगल त्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले जे त्यांच्यानंतर गायन क्षेत्रात आले होते. तसेच अनेक लोकांनी त्यांची नक्कल पण केली होती. या गायकांमध्ये मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे सैगल यांनी गाण्याचे शिक्षण पण घेतले नव्हते.
गाण्यावर मजबूत पकड असणार्या सैगल यांचे सुरवातीचे आयुष्य अत्यंत साधे होते. त्यांनी जरी संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी ते आपल्या आई सोबत मंदिरात भजन इत्यादी गात असत. त्यांनी शालेय शिक्षण पण घेतले नव्हते पण त्यांनी टाइमकीपर आणि सेल्समेन च्या रुपात काम पण केले होते.
त्यांना पहिल्यांदा 1932 मध्ये एक मोठे काम kinva आपण असे ही म्हणू शकतो की रुपेरी पडद्यावर ब्रेक मिळाला होता. न्यू थिएटर्स नावाच्या फिल्म स्टूडियो मध्ये त्यांना तीन चित्रपटांमध्ये काम देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पूरण भगत नावच्या एक चित्रपटात गीत पण गायले होते. त्यानंतरच त्यांची जगभर ओळख निर्माण झाली होती.
आज चा डूडल या महान अभिनेते आणि गायक कुंडल लाल सैगल यांना आदरांजली देताना दिसत आहे. आम्ही पण त्यांच्या पुढे नतमस्तक आहोत.