FIFA वर्ल्ड कप 2018 ची सुरवात झाली आहे आणि Google ने या फूटबॉल इवेंट ला Doodle सोबत सेलिब्रेट केले होते, तसेच आज पुन्हा वर्ल्ड कपच्या दुसर्या दिवशी सर्च जॅयंट ने Doodle च्या माध्यमातुन एक कारॉसेल (फिरती पट्टी) तयार केली आहे ज्यात दाखवण्यात आले आहे की इजिप्त, इराण, मोरक्को, पोर्तुगाल, स्पेन आणि उरुग्वे देशांसाठी हा खेळ किती महत्त्वपूर्ण आहे.
Doodle कारॉसेल मधून पार्टीसिपेट करणार्या सर्व 32 देशांची संस्कृती दाखविण्यात आली आहे. ही कारॉसेल प्रत्येक देशातील गेस्ट आर्टिस्ट द्वारा फीचर करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आगामी काळात आपल्याला इतर देशातील आर्टिस्ट द्वारा अजून काही आर्टवर्क बघायला मिळू शकतात.
Google चे म्हणेन आहे की तुम्ही सीजन मध्ये सर्व 32 Doodle बघू शकाल. प्रत्येक चित्रात आर्टिस्ट ने दाखवले आहे की त्यांच्या देशात फूटबॉल कडे कशा प्रकारे बघितले जाते. डूडल वरील कारॉसेल क्लिक करून तुम्ही प्रत्येक देशातील आर्ट बघू शकाल.
इजिप्त चे आर्टिस्ट Shennawy ने सांगितले की, "हा इजिप्त मधील लोकांची आत्मा आहे!” फोटो मध्ये युवक एका व्यस्त बाजारात खेळताना दिसत आहेत आणि तिथून जाताना एक महिला त्यांच कौतुक करत आहे.
इराण चे आर्टिस्ट Rashin Kheiriyeh ने सांगितले, “फूटबॉल इराण मध्ये एक मोठा खेळ आहे आणि इराणी लोकांना फूटबॉल बघणे आणि खेळणे आवडते. वर्ल्ड कप एक मोठा इवेंट आहे जो लोकांना आमच्या राष्ट्रीय टीम ला सपोर्ट करण्यासाठी एकत्रित आणतो.”
पोर्तुगाल चे आर्टिस्ट Tiago Galo ला विचारल्यावर त्यांनी सांगितले की, “जिथे तुम्ही जाल तिथे फूटबॉल आहे. प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक कॉफी शॉप मध्ये, प्रत्येक जण एक तर झालेल्या मॅच बद्दल बोलत असतो किंवा मग आगामी मॅच बद्दल”
स्पेन चे आर्टिस्ट Andrés Lozano ने सांगितले, फूटबॉल स्पेन मध्ये खेळांचा राजा म्हणून ओळखला जातो, यावरुन तुम्ही याचे महत्व जाणून घेऊ शकता. हा प्रत्येक नागरिकाच्या जीवनचा भाग आहे, मग तुम्ही स्पोर्ट्स मध्ये असा वा नसा.