गूगल ने डूडल च्या माध्यमातुन साजरा केला कामगार दिन

गूगल ने डूडल च्या माध्यमातुन साजरा केला कामगार दिन
HIGHLIGHTS

भारतात हा दिवस जागतिक कामगार दिन नावाने साजरा केला जातो आणि हा दिवस पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये एक महत्वपूर्ण उस्तव मानला जातो.

आज गूगल डूडल च्या माध्यमातून कामगार दिवस म्हणजे जागतिक कामगार दिन साजरा करत आहे. 1 मे ला कामगार दिवस साजरा केला जातो. कामगार दिवसाची सुरुवात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली होती जेव्हा अमेरिकेत ट्रेड यूनियन आणि श्रम आंदोलन वाढले होते. भारता सह अनेक देशांमध्ये आज सार्वजनिक सुट्टी साजरी केली जाते, पण या दिवसाला उत्तर भारतात इतके महत्व दिले जात नाही जितके आधी दिले जायचे. 

1 मे 1886 मध्ये शिकागो मध्ये पोलिसांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला की 1 मे ला अंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या रुपात साजरा केला जाईल. 4 मे 1886 ला कामगारांचा 8 तासांचा बंद आणि कामगारांची हत्ये नंतर Haymarket Square, शिकागो मध्ये कामगारांच्या समर्थनार्थ एक शांतिपूर्ण रॅली झाली. 
विरोध करताना एक व्यक्ति ने पोलिसांवर एक डायनामाइट बॉम्ब टाकला. त्यानंतर गोळीबार सुरू झाला आणि सात पोलीस कर्मी तसेच कमीत कमी चार नागरिक मारले गेले. ही घटना Haymarket अफेयर नावाने उल्लेखली जाते. भारतात हा दिवस जागतिक कामगार दिन नावाने साजरा केला जातो आणि हा दिवस पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये एक महत्वपूर्ण उस्तव मानला जातो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo