FIFA वर्ल्ड कप च्या आठव्या दिवशी Google ने आशा प्रकारे तयार केला Doodle
आज च्या Google Doodle मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या 6 टीम्स दाखविण्यात आल्या आहेत, ज्यात रशिया, डेनमार्क, ऑस्ट्रेलिया, फ्रांस, पेरू, अर्जेंटीना आणि क्रोएशिया यांचा समावेश आहे.
Google Doodle celebrates 8th day of FIFA world cup: FIFA वर्ल्ड कप सुरू होऊन 8 दिवस झाले आहेत आणि आता पर्यंत Google ने अनेक डूडल्स च्या माध्यमातून वर्ल्ड कप साजरा केला आहे. आज च्या Doodle मध्ये तुम्हाला 6 अन्य देशांची संस्कृती दाखवण्यात आली आहे. Doodle वर दिलेल्या प्ले आइकॉन वर क्लिक करताचा Google पार्टिसिपेट करणार्या वेगवेगळ्या देशांची संस्कृती आणि प्रतिभा दाखवतो.
FIFA वर्ल्ड कप 14 जून पासून सुरू झाला आहे आणि शेवटची मॅच 15 जुलै ला लुझनिकी स्टेडियम मध्ये होईल. आज च्या Google Doodle मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या 6 टीम्स दाखविण्यात आल्या आहेत, ज्यात रशिया, डेनमार्क, ऑस्ट्रेलिया, फ्रांस, पेरू, अर्जेंटीना आणि क्रोएशिया यांचा समावेश आहे.
या Doodle च्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे की त्या प्रत्येक देशासाठी फूटबॉल गेम चे काय महत्व आहे ते. Doodle च्या खाली या देशांचे झेंडे पण दाखविण्यात आले आहेत. या संपूर्ण सीजन मध्ये आपल्याला सर्व पार्टिसिपेट करणार्या देशांची संस्कृती आणि प्रतिभा बघायला मिळेल.