आज लोकांसमोर पनामा, स्वीडन, बेल्जियम, इंग्लंड आणि टुनिशिया ची संस्कृती दाखविण्यात आली आहे.
आज FIFA वर्ल्ड कप 2018 चा पाचवा दिवस आहे आणि गूगल ने आज या दिवसासाठी Google डूडल तयार केली आहे. डूडल वर दिलेल्या प्ले आइकॉन वर क्लिक केल्यावर गूगल पार्टिसिपेट करणार्या वेगवेगळ्या देशांची संस्कृती दाखवतो, ज्यांना त्या देशातील आर्टिस्ट ने तयार केले आहे.
आज लोकांसमोर पनामा, स्वीडन, बेल्जियम, इंग्लंड आणि टुनिशिया ची संस्कृती दाखविण्यात आली आहे. डूडल मध्ये दक्षिण कोरिया, स्वीडन, बेल्जियम, टुनिशिया, पनामा आणि इंग्लंड चे झेंडे दाखवण्यात आले आहेत.
या चित्रांमध्ये कलाकारांनी दाखवले आहे की "त्यांच्या देशात फूटबॉल कशा प्रकारे बघितले जाते." गूगल ने वादा केला होता कि तुम्हाला या सीजन मध्ये सर्व 32 देशांचे डूडल बघायला मिळतील. रोज तिन मॅच होत आहेत. आगामी दिवसांमध्ये आपल्याला इतर अनेक देशांची संस्कृती बघायला मिळेल, जी गूगल डूडल च्या माध्यमातून सादर करेल.