Google Chrome Alert : तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर सावधान, सरकारने दिला इशारा

Updated on 22-Aug-2022
HIGHLIGHTS

गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी सरकारकडून इशारा

हॅकर्स तुमचे संगणक हॅक करू शकतात

जाणून घ्या, सुरक्षेसाठी काय कराल?

तुम्हीही लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर ब्राउझिंगसाठी गुगल क्रोम वापरत असाल तर सध्या तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. गुगल क्रोम वापरणाऱ्यांना भारत सरकारने इशारा दिला आहे. हा इशारा आयटी मंत्रालयाच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (SERT-In) ने डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला आहे. SERT-In नुसार, Google Chrome मध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स सहजपणे संगणक हॅक करू शकतात. SERT-In ने यापूर्वी Apple iOS, Apple iPad आणि MacOS मधील बग्सबाबत चेतावणी जारी केली होती.

हे सुद्धा वाचा : Jio vs Airtel: दररोज 1GB डेटासह कोणाचा प्लॅन स्वस्त आणि सर्वोत्तम, पहा यादी

गुगल क्रोममध्ये 'या' त्रुटी आढळल्या

SERT-In च्या ऍडवायरीनुसार, Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन, हॅकर्स तुमच्या सिस्टमला  क्राफ्टेड रिक्वेस्ट पाठवून आर्बिटर्री कोड एग्जीक्यूट करू शकतात. हा कोड तुमच्या संगणकाच्या सुरक्षिततेला बायपास करू शकतो आणि तुमची सिस्टम पूर्णपणे हॅक करू शकतो. 

 याआधी, SERT-In ने Apple iOS, Apple iPad आणि MacOS च्या बग्सबाबत चेतावणी दिली होती. Apple  उपकरणांच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक बग आहे, ज्याचा हॅकर्सकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. यानंतर Apple ने आपल्या यूजर्सला तात्काळ आपत्कालीन अपडेट करण्यास सांगितले.

सिक्युरिटीसाठी 'हे' करा

हॅकिंग टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना प्रथम त्यांचे Google Chrome लेटेस्ट वर्जनवर अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच, वापरकर्त्यांनी अज्ञात असलेल्या लिंकवर क्लिक करणे आणि अनोळखी वेबसाइटला भेट देणे टाळावे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :