गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ला २०१५ मध्ये जवळपास ६६७ करोड ($100.5 मिलियन) पगार मिळाला. ही माहिती नियामक फायलिंग कंपनी अल्फाबेट ने दिली आहे. तसेच त्यांच्या भरभक्कम पगारामुळे पिचाय यांचे नाव अमेरिकेच्या टॉप एक्झिक्युटिव्ह्स च्या यादीत गेले आहे.
सुंदर पिचाईंना हा पगार दोन प्रकारे दिली आहे. त्यांना डॉलर ९९.८ मिलियनचे प्रतिबंधित स्टॉक दिले गेले आहे, ज्याचा लाभ ते २०१७ पासून घेऊन शकतात. त्याचबरोबर त्यांना डॉलर ६५२,५०० हा पगार सुद्धा देण्यात आला आहे.
हेदेखील पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू Video
२००४ साली सुंदर पिचाय यांनी सर्च इंजिन कंपनी गुगल जॉईन केली होती आणि जगभरातील ग्राहकांसाठी कंपनीने बनवलेल्या नवीन प्रोडक्ट्सची जबाबदारी संभाळली. ह्याआधी त्यांनी जिमेल आणि गुगल मॅप अॅप्सही बनवले, जे अतिशय लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांचे पुर्ण लक्ष गुगल ब्राउझर क्रोमवर राहिले.
हेदेखील वाचा – Voot:भारतात लाँच झाली व्हिडियो-ऑन-डिमांड सेवा
हेेदेखील वाचा – शाओमी लाँच केला 3GB रॅम असलेला रेडमी 3 प्रो