बालदिनच्या निमित्ताने Google ने बनवले हे Doodle

बालदिनच्या निमित्ताने Google ने बनवले हे Doodle
HIGHLIGHTS

14 नोव्हेंबर बालदिन करण्यासाठी गूगल ने नवीन डूडल तयार केले आहे जे मुंबईच्या पिंगला राहुल मोरे हिने बनवले आहे.

गूगल ने आज बालदिनच्या निमित्ताने गूगल डूडल तयार केले आहे जे मुंबईच्या पिंगला राहुल मोरे हिने बनवले आहे, जी भारतातील 2018 डूडल 4 गूगल प्रतिस्पर्धाची विजेता आहे. डूडल मध्ये दाखवण्यात आले आहे एक मुलगी दुर्बिणीच्या मदतीने आकाश आणि तारे बघत आहे. आपले विचार अजून प्रगल्भ करण्यासाठी ती अवकाश सविस्तरपणे बघण्याचा प्रयत्न करत आहे ज्यात आकाशगंगा, ग्रह आणि स्पेसक्राफ्ट्स दाखवण्यात आले आहेत. 

बालदिनच्या दिवशी देशात सर्व विद्यालयांत भारताचे पहिले पंतप्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी अनेक प्रकारचे उपक्रम केले जातात. भारतात जवहारलाल नेहरु यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बालदिन साजरा केला जातो, त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 ला झाला होता.

जवाहरलाल नेहरु हे चाचा नेहरु आणि चाचा जी म्हणून पण ओळखले जातात आणि देशभरातील लहान मुलांवर त्यांचे जे प्रेम होते ते यादिवशी साजरे केले जाते. 1947 मध्ये देश स्वतंत्र होण्यापूर्वी 20 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जात होता, हा दिवस यूनाइटेड नेशंस द्वारा युनिवर्सल चिल्ड्रेन डे म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी देशभरातिला शाळांमध्ये अनेक प्रकारचे खेळ-स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo