गूगल ने डूडल च्या माध्यमातून आज चिपको आंदोलनाला 45व्या वर्ष पूर्ति निमित्ताने दिली सलामी
उत्तर प्रदेश च्या चमोली जिल्ह्यात वर्ष 1973 मध्ये हे आंदोलन सुरू झाले होते आणि याची सुरवात प्रसिद्ध पर्यावरणवादी सुदंरलाल बहुगुणा यांनी केली होती.
चिपको आंदोलनाचे उद्देश्य त्यावेळेस चालू असलेल्या जंगलतोडी कडे लक्ष वेधने होते. रस्ते, धरण आणि उद्योगांच्या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड चालू होती. उत्तर प्रदेश च्या चमोली जिल्ह्यात वर्ष 1973 मध्ये हे आंदोलन सुरू झाले होते आणि याची सुरवात प्रसिद्ध पर्यावरणवादी सुदंरलाल बहुगुणा यांनी केली होती.
जसे की चिपको या शब्दावरून आपल्याला समजत आहे की या आंदोलनात लोक झाडांना तोडण्यापासुन वाचविण्यासाठी त्या झाडांना मीठी मारत असत. या आंदोलनाची मुख्य विशेषता म्हणजे यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवलेला होता.
आज च्या गूगल डूडल मध्ये दाखविण्यात आले आहे की जंगलातील झाडांच्या चारी बाजूला महिला घेराव घालून उभ्या आहेत त्यासाठी त्यांनी एकमेकांचे हात पकडले आहेत.
मुळ चिपको आंदोलनाची सुरवात 18 व्या शतकात राजस्थानात झाली होती. बिश्नोई समुदायाच्या लोकांनी झाडे तोडण्याचा विरोध केला होता. कारण तसा जोधपुर च्या महाराजांनी आदेश दिला होता. पण आंदोलनामुळे सर्व बिश्नोई गावांमध्ये झाडे तोडण्यावर बंदी आणण्याचा एक शाही आदेश जारी केला.