Google चा झाला ‘Where Is My Train’ ऍप्प, जानिये आप क्या कर सकते आहें

Updated on 18-Dec-2018
HIGHLIGHTS

Sigmoid लॅबच्या टीमने याची घोषणा केली आहे की ते गूगलला जॉईन होणार आहेत, विशेष म्हणजे या ऍप्पला रेकॉर्ड 10 मिलियन डाउनलोड मिळाले आहेत.

Google ने भारतात पहिल्या अधिग्रहणाला सुरवात केली आहे. गूगल ने बँगलोर मधील स्टार्टअप Where Is My Train ला आपल्यात सामील करून घेतले आहे. या ऍप्पच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेन संबंधित अपडेट मिळतात, या ऍप्प मध्ये तुम्हाला इंटरनेट आणि GPS ची पण गरज नाही. 

काय म्हणाली Sigmoid Labs Team?

एका पोस्ट मध्ये व्हेर इज माय ट्रेन च्या Sigmoid Labs Team ने असे लिहिले आहे की ते गूगलला जॉईन करणार आहेत. विशेष म्हणजे या ऍप्पची निर्मिती US आधारित एक टेक्नॉलॉजी-एंटरटेनमेंट कंपनी Tivo कारपोरेशनच्या पाच एग्जीक्यूटिव्सनि केली आहे. यात अहमद निजाम मोहिदीन, मिनाक्षी सुन्दरम, बाळासुब्रमनियम राजेंद्रन आणि शशि कुमार वेंकटरमण यांचा समावेश आहे. 
त्यांच्यानुसार, “आमचे मिशन पुढे नेण्यासाठी यापेक्षा चांगला प्लॅटफार्म असू शकत नव्हता, आम्ही गूगलला जॉईन करून खूप खुश आहोत.”

Where Is My Train चे 10 मिलियन डाउनलोड

विशेष म्हणजे या ऍप्पला आता पर्यंत जवळपास 10 मिलियन डाउनलोड मिळाले आहेत. याला सेल टावर्स कडून माहिती दिली जाते. खास बाब अशी की ऍप्प मध्ये इंटरनेट किंवा GPS चा वापर केला जात नाही, ट्रेनच्या रियल टाइम साठी केला जातो. हा ऍप्प यूजर्सना त्यांचा सोर्स आणि डेस्टिनेशन ऍप्प मध्ये सिलेक्ट केल्यानंतर ट्रेन पण सिलेक्ट करण्यास मदत करतो. हि सेवा सध्या इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
या ऍप्प मधून ट्रेनने यात्रा करणाऱ्या लाखो यूजर्सचे जीवन सुगम होते. तुम्हाला तर माहीतच आहे की भारतीय रेल्वे जगातील चौथा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क आहे. याची एकूण लांबी 67,368 किलोमीटर आहे. हे आकडे 2016-17 चे आहेत.
 

 

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :