हा फोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसरसह येतो. ह्या फोनमध्ये 1GB चे रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.
जिओनीने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन पायनियर P5 मिनी लाँच केला आहे. ह्या फोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंमतीसह लिस्ट केले गेले आहे. कंपनीने ह्या फोनची किंमत ५,३४९ रुपये ठेवली आहे आणि हा विक्रीसाठी उपलब्ध आहे.
जिओनी पायनियर P5 मिनी स्मार्टफोन 4.5 इंचाच्या FWVGA ऑन-सेल डिस्प्लेने सुसज्ज आहे. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. ज्याच्यावर अमिगो 3.1 स्किन दिली गेली आहे. फोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर सह येतो. ह्या फोनमध्ये 1GB चे रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. ह्याचे अंतर्गत स्टोरेज मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
जिओनी पायनियर P5 मिनी स्मार्टफोनमध्ये फ्लॅशसह 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन 1850mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. स्मार्टफोनचे डायमेंशन 132x66x9.1 मिलीमीटर आणि वजन १५३ ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन लाल, काळा, पांढरा, निळा, पिवळा आणि सोनेरी रंगात उपलब्ध आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, ब्लूटुथ V4.0, वायफाय 802.11 B/G/N, GPS, A-GPS सारखे फीचर्स दिले आहेत. हा फोन स्मार्ट गेस्चर, मूड कार्ड, जिस्टोर, इको मोड, एमी लॉकर, चाइल्ड मोडसारखे अनेक फीचर्सने सुसज्ज आहे. फोनमध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, जी-सेंसर, ई-कंपास, मोशन सेंसरसुद्धा आहे.