अडथड्याशिवाय बघा चित्रपट आणि वेब सिरीज, Amazon Prime Video आणि Hotstar सब्सक्रिप्शन मोफत

अडथड्याशिवाय बघा चित्रपट आणि वेब सिरीज, Amazon Prime Video आणि Hotstar सब्सक्रिप्शन मोफत
HIGHLIGHTS

Amazon Prime Video आणि Hoster चे मोफत सबस्क्रिप्शन मिळवा

एका वर्षासाठी वेब सिरीज आणि वेब शोचा मोफत आनंद घ्या.

Airtel चा 3,359 रिचार्ज प्लॅनमध्ये मिळतील फायदे

OTT प्लॅटफॉर्मचा ट्रेंड भारतात झपाट्याने वाढत आहे. वेब सीरिज, वेब शो आणि चित्रपट पाहण्यासाठी वापरकर्ते त्यांचा भरपूर वापर करतात. Amazon Prime Video आणि Hotstar हे देशातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही हे दोन्ही OTT प्लॅटफॉर्म एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत बघू शकता.

हे सुद्धा वाचा : Aadhaar Mitra म्हणजे काय ? मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे…

तुम्हालाही Amazon Prime Video आणि Hoster चे मोफत सबस्क्रिप्शन हवे असल्यास ही ऑफर तुमच्यासाठी आहे. भारतीय टेलिकॉम कंपनी Airtel चा जबरदस्त 3,359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये Amazon Prime Video आणि Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी उपलब्ध असेल.

Airtel चा 3,359 रिचार्ज प्लॅन

Airtel च्या 3,359 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळतात. यामध्ये केवळ अमर्यादित कॉलिंगच नाही तर दररोज 2.5 GB डेटा मिळतो. याशिवाय दररोज 100 SMS ही मिळणार आहेत. Airtel चा हा उत्तम प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो.

विशेष म्हणजे युजर्सना यामध्ये Amazon Prime Video आणि Hotstar मोबाईल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. यासाठी वेगळा पैसा खर्च करावा लागणार नाही. Amazon Prime Video आणि Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी वैध असेल.

या रिचार्जवर तीन महिन्यांसाठी अपोलो 24×7 सेवा आणि FASTag रिचार्ज केल्यावर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. संगीत प्रेमींसाठी एक अतिरिक्त फायदा देखील आहे. या रिचार्जवर हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचे सबस्क्रिप्शनही मोफत उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo