Ganesh Chaturthi 2024: ‘या’ गणेश चतुर्थीला प्रियजनांना WhatsApp मेसेज, Video आणि Status द्वारे द्या भारी शुभेच्छा!

Updated on 06-Sep-2024
HIGHLIGHTS

यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे.

या सणाच्या 10 दिवसांमध्ये घराघरात अगदी भक्तिमय वातावरण असतो.

बाप्पांच्या आगमनाच्या शुभेच्छा तुम्ही WhatsApp मॅसेजेस, स्टेटस आणि व्हीडिओजद्वारे

Ganesh Chaturthi 2024: ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. महाराष्ट्रात अनेकांच्या घरी बाप्पांचे आगमन होते. या सणाच्या 10 दिवसांमध्ये घराघरात अगदी भक्तिमय वातावरण असतो. बाप्पांच्या आगमनाच्या अप्रतिम शुभेच्छा तुम्ही WhatsApp मॅसेजेस, स्टेटस आणि व्हीडिओजद्वारे आपल्या प्रियजनांना देऊ शकता. चला तर मग पाहुयात गणेश चतुर्थीच्या अप्रतिम शुभेच्छा-

Also Read: Limited Time Offer! टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea ‘या’ प्लॅन्ससह देतोय बोनस डेटा एकदम Free, पहा डिटेल्स

WhatsApp द्वारे गणेश चतुर्थीच्या पुढीलप्रमाणे अप्रतिम शुभेच्छा द्या.

  • आपल्या जीवनात गणरायाची कृपा नेहमीच असो. या गणेश चतुर्थीला सुख, शांती व समृद्धीचा अनुभव घ्या.
  • गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला सुख, समृद्धी आणि यश मिळो. गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
  • गणेश चतुर्थीच्या पावन अवसरावर गणराय आपल्या जीवनात आनंद व समृद्धीची भरभराट करोत! गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
  • गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या जीवनात आनंदाचे आणि सुखाचे रंग फुलून जावो. शुभेच्छा!
  • गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर गणराय आपल्याला आरोग्य, सुख आणि यश प्रदान करो! आपल्या घरात आनंद आणि उत्साह नवा रंग आणो. शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2024 च्या शुभेच्छा हिंदी भाषिक प्रियजनांना द्यायची असतील तर येथे क्लिक करा.

WhatsApp वर गणेश चतुर्थीला पुढीलप्रमाणे Status ठेवा.

  • वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा! सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • मोदकांचा केला प्रसाद, केला लाल फुलांचा हार, मखर झाले नटून तयार, आले वाजत गाजत बाप्पा, गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे. सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
  • सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती समोर दिसावी, मुखी असावे बाप्पाचे नाव, सोपे होईल सर्व काम. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
  • मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक, तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी, जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी.
  • तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा.

‘अशा’प्रकारे करा व्हिडिओ डाउनलोड.

जर तुम्हाला सोशल मीडियावरील गणेश चतुर्थी संबंधित व्हीडिओ WhatsApp द्वारे प्रियजनांना पाठवून शुभेच्छा द्यायच्या असतील तर, ते व्हीडिओ तुम्हाला आधी डाऊनलोड करावा लागेल. डाउनलोड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

  • सोशल मीडियावरील आवडलेल्या व्हीडिओची लिंक कॉपी करा.
  • आता गुगल सर्चवर जाऊन उदा. ‘यु-ट्यूब व्हीडिओ डाउनलोड’ किंवा ‘इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड’ सर्च करा.
  • असे केल्यास तुमच्या स्क्रीनवर अनेक साईट दिसतील. एखादी योग्य साईट सिलेक्ट करून त्यामध्ये ‘व्हीडिओ लिंक पेस्ट’चे ऑप्शन दिले.
  • व्हीडिओ लिंक पेस्ट केल्यानंतर निवडलेला व्हीडिओ सहज मोफत डाउनलोड होईल.

हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तुम्ही हा व्हीडिओ WhatsApp द्वारे आपल्या प्रियजनांना पाठवू शकता अथवा Whatsapp स्टेटसवर देखील ठेवता येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :