ह्या डिवाइसमध्ये 5000mAh ची बॅटरीसुद्धा दिली आहे. त्याशिवाय ह्या टॅबलेटमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
सॅमसंगने बाजारात आपला नवीन टॅबलेट गॅलेक्सी टॅब E LTE लाँच केला आहे. हा टॅबलेट क्वाड-कोर 1.3GHz प्रोसेसर आणि 8 इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. सध्यातरी ह्या डिवाइसला कॅनडामध्ये लाँच केले आहे. ह्या डिवाइसला कंपनीच्या वेबसाइटवरसुद्धा लिस्ट केले आहे.
हा डिवाइस 1.5GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे आणि ह्या स्टोरेजला आपण वाढवूही शकतो. ह्या डिवाइसमध्ये 5000mAh ची बॅटरीसुद्धा दिली आहे. त्याशिवाय ह्या टॅबलेटमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्या डिवाइसचा आकार 212.1×126.1×8.9mm आणि वजन 360 ग्रॅम आहे. हा टॅबलेट अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.सॅमसंग गॅलेक्सी टॅब E LTE ची किंमत CAD 290 (जवळपास $ 228) आहे.