Friendship Day 2024: विशेष शुभेच्छांसह तुमच्या मित्रांचा दिवसही खास बनवा! WhatsApp वर Status, GIF द्वारे द्या शुभेच्छा

Friendship Day 2024: विशेष शुभेच्छांसह तुमच्या मित्रांचा दिवसही खास बनवा! WhatsApp वर Status, GIF द्वारे द्या शुभेच्छा
HIGHLIGHTS

Friendship Day 2024 निमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना खास शुभेच्छा द्या.

तुम्ही WhatsApp द्वारे तुमच्या मित्र मैत्रिणींना भारी शुभेच्छा देऊ शकता.

WhatsApp वर स्टेटस, GIF इ. डाउनलोड करून शुभेच्छा द्या.

Friendship Day 2024: आज फ्रेंडशिप डे म्हणजेच मंत्रीचा दिवस होय. या दिवशी शाळा कॉलेजमधील मुलं आपल्या मित्रांच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधून आपली मैत्री साजरी करतात. मात्र, कॉलेजनंतर सर्व मित्र-मैत्रिणी करियरसाठी एकमेकांपासून दुसऱ्या शहरात राहतात. त्यामुळे ते ऑनलाईन आपल्या मित्रमैत्रिणींना विश करतात. हा दिवस आनंद आणि मजबूत करण्याचा आणि आपल्या मित्रांसोबतचे नाते साजरे करण्याचा आहे. चला तर मग जाणून घेऊयात मैत्री दिनानिमित्त WhatsApp वर तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवता येतील अशा खास शुभेच्छा आणि तसेच Video, फोटो, GIF डाउनलोड करूनही तुम्ही Friendship Day च्या शुभेच्छा देऊ शकता.

  • जीवनात कितीही मित्र-मैत्रिणी भेटू द्या, पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही, फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा.
  • मैत्रीतल्या प्रेमाला कधीच अंत नसतो, मार्ग कोणताही असू दे तो जगाहून सुंदर असतो.
  • पावसात जितका ओलावा नाही, तितका प्रेमाचा जिव्हाळा आपल्या नात्यात आहे. ही नुसतीच मैत्री आहे की जगावेगळं प्रेम आहे. फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा
  • आवडत्या व्यक्तीच्या मनाची काळजी, स्वतःच्या मनापेक्षा जास्त घेणं म्हणजे ‘मैत्री’ होय. पलीकडचं प्रेम… फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा!!!
  • शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी, पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी. Friendship Day च्या जबरदस्त शुभेच्छा!
  • जर तुम्हाला हिंदी भाषिक मित्र मैत्रिणींना शुभेच्छा द्यायच्या असतील, तर येथे क्लिक करा. 

WhatsApp वर Friendship Day स्टेटस कसे ठेवता येईल?

जर तुम्हाला तुमच्या WhatsApp स्टेटसद्वारे तुमच्या जवळच्या व्यक्तींना आणि तुमच्या मित्रांना एकाच वेळी शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही WhatsApp स्टेटसची मदत नक्कीच घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

Happy Friendship Day 2024 Wishes
  • सर्वप्रथम तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा. त्यानंतर स्टेटस टॅबवर जा.
  • टॅबमध्ये, स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे My Status वर टॅप करा किंवा ‘+’ चिन्हावर टॅप करा.
  • तुमच्या फोनच्या गॅलरीमधून एखादा फोटो किंवा व्हिडिओ निवडा जो तुम्हाला स्टेटस म्हणून शेअर करायचा आहे. तुम्ही कॅमेऱ्याने थेट फोटो घेऊ शकता किंवा व्हिडिओ रेकॉर्ड देखील करू शकता.
  • तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ निवडल्यानंतर, तुम्ही तो एडिट करू शकता. WhatsApp तुम्हाला फोटोंवर टेक्स्ट, इमोजी, स्टिकर्स आणि ड्रॉईंग करण्याचा पर्याय देखील देतो.
  • एडिट केल्यानंतर, स्क्रीनच्या बॉटमला उजवीकडे पाठवा किंवा पोस्ट बटणवर टॅप करा. तुमची स्टेटस अपडेट आता तुमच्या संपर्कांना दिसतील.
  • जर तुम्हाला स्टेटस डिलीट करायचे असेल तर, तुम्हाला डिलीट पर्याय देखील मिळतो.

WhatsApp स्टेटस व्हिडिओ डाउनलोड कसे कराल?

तुमच्या संपर्कांनी ठेवलेले कोणतेही WhatsApp स्टेटस तुम्हाला पाठवायचे असेल तर तुम्ही ते स्टेटस डाउनलोड करून तुमच्या कोणत्याही मित्राला पाठवू शकता. पहा प्रक्रिया:

  • तुमच्या स्मार्टफोनवर फाईल मॅनेजर ओपन करा.
  • आता WhatsApp फोल्डरवर जा आणि नंतर मीडिया > स्टेटस फोल्डर ओपन करा.
  • येथे तुम्हाला तुम्ही नुकतेच पाहिलेले सर्व स्टेटस व्हिडिओ आणि इमेजेस मिळतील.
  • तुम्हाला डाउनलोड करायचा असलेला व्हिडिओ कॉपी किंवा मुव्ह करा. नंतर, तो तुमच्या गॅलरी किंवा इतर कोणत्याही फोल्डरमध्ये पेस्ट करा.
WhatsApp वर हॅपी फ्रेंडशिप डे इमेज किंवा GIF किंवा व्हिडिओ कसा पाठवायचा?

WhatsApp वर हॅपी फ्रेंडशिप डे इमेज किंवा GIF किंवा व्हिडिओ कसा पाठवायचा?

  • सर्व प्रथम तुमचे व्हॉट्सॲप ओपन करा.
  • आता तुमच्या प्रिय मित्राला मॅसेज, इमेज किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी त्याचा चॅट बॉक्स उघडा.
  • येथे मेसेज बॉक्स चॅटवर जा आणि तुमच्या फोटो गॅलरीमधून डाउनलोड केलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडा आणि पाठवा.

WhatsApp GIF कसे पाठवायचे?

  • तुमच्या प्रिय मित्राचे WhatsApp चॅट उघडा.
  • आता व्हॉट्सॲप चॅटमधील GIF पर्यायावर जा.
  • तुमचा आवडता GIF किंवा स्टिकर तुमच्या मित्राला पाठवा.

अशाप्रकारे वरील सर्व पद्धती वापरून तुमच्या लांब असणाऱ्या मित्र-मैत्रिणींना Friendship Day 2024 च्या शुभेच्छा द्या.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo