Friday Release : या शुक्रवारी हिंदी आणि मराठी चित्रपटांसह ‘या’ वेब सिरीज होणार रिलीज
या शुक्रवारी रिलीज होणारे हिंदी आणि मराठी चित्रपट
चित्रपटांसह काही वेब सिरीजदेखील रिलीज होणार
सिनेरसिकांसाठी हा आठवडा मनोरंजनाची भरपूर असेल
ऑगस्टचा शेवटचा वीकेंड मनोरंजन विश्वासाठी खूप रोमांचक असणार आहे. कारण या आठवड्यात हिंदी मराठी चित्रपटांसह काही वेब सिरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला महिन्याचा हा शेवटचा आठवडा मनोरंजनाने परिपूर्ण बनवायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी चित्रपट आणि सिरीजची संपूर्ण यादी घेऊन आलो आहोत. सिनेरसिक आणि प्रेक्षक या यादीतील चित्रपट किंवा सिरीजचा आनंद घेऊ शकता.
हे सुद्धा वाचा : आकर्षक डिझाईनसह Moto G72 लवकरच भारतात होणार लाँच, जाणून घ्या फोनचे अपेक्षित फीचर्स
दोन मराठी चित्रपटांमध्ये स्पर्धा
मराठी चित्रपट जबरदस्त कंटेंटसाठी ओळखला जातो. आत्तापर्यंत असे अनेक मराठी चित्रपट बनले आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. या आठवड्यातही मराठी सिनेसृष्टीतील 'समायरा' आणि 'राष्ट्र' हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे.
हिंदीत दोन चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार
या आठवड्यात हिंदी भाषेत मोठ्या पडद्यावर दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे तो म्हणजे 'लाइगर'. या चित्रपटातून अभिनेता विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय अभिनेत्री रम्या कृष्णन आणि अनन्या पांडे देखील दिसणार आहेत. मात्र, हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय संजय मिश्रा यांचा 'होली काऊ' हा चित्रपटही या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धूम ठोकणार आहे.
दिल्ली क्राइम 2
दिल्ली क्राइमचा पहिला सीझन हिट झाल्यानंतर आता त्याचा दुसरा सीझन रिलीज होणार आहे. या सिरीज शेफाली शाह पुन्हा एकदा DCP वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिरीज 26 ऑगस्टला NETFLIXवर प्रदर्शित होणार आहे.
क्रिमिनल जस्टिस सीजन 3
दोन सीझनच्या शानदार यशानंतर, आता पंकज त्रिपाठी अभिनीत क्रिमिनल जस्टिसचा तिसरा भाग पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ही सिरीज 26 ऑगस्टपासून DISNEY + HOTSTAR वर स्ट्रीम केली जाऊ शकते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile