Aadhar Card वापरकर्त्यांसाठी एक मोठे अपडेट आले आहे. जे त्यांचे तपशील विनामूल्य अपडेट करण्याची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने myAadhaar पोर्टलद्वारे आधार तपशील अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. होय, मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम तारीख आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा: Infinix Smart 8 HD बजेट स्मार्टफोनची पहिली Sale Flipkart वर सुरु, कमी किमतीत मिळतील तगडे फीचर्स। Tech News
UIDAI ने या संदर्भात नोटीस जारी करून म्हटले आहे की, “नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादाच्या आधारे, ही सुविधा आणखी 3 महिने म्हणजे 15/12/2023 ते 14/03/2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, myAadhaar पोर्टलद्वारे कागदपत्रे अपडेट करण्याची सुविधा मोफत असेल.” पुढे, “लोकसंख्याशास्त्रीय माहितीची अचूकता राखण्यासाठी कृपया तुमचे आधार अपडेट करा,” असे UIDAI ने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. ऑनलाइन अपडेट करता येणाऱ्या डेटामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फोन नंबर आणि ईमेल आयडी यांचा समावेश होतो.
लक्षात घ्या की, ही सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर विनामूल्य आहे. इतर काही बायोमेट्रिक माहिती केवळ भौतिक आधार केंद्रांना भेट देऊन अपडेट केली जाऊ शकते. जर तुम्ही भौतिक आधार केंद्रांवर जाऊन आधार अपडेट केले तर 50 रुपये शुल्क आकारले जाते.
मागील अनेक महिन्यांपासून, UIDAI नागरिकांना त्यांचे आधार तपशील अपडेट करण्याचे आवाहन करत आहे. UIDAI वापरकर्त्यांना त्यांचे तपशील अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. जेणेकरून आधारशी संबंधित फसवणूक टाळता येईल, असा यामागील उद्देश आहे.
अशाप्रकारे तुमचे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने मोफत अपडेट केले जाईल. परंतु, 14 मार्च 2024 नंतर या ऑनलाइन अपडेटसाठी 25 रुपये शुल्क म्हणून भरावे लागतील.