Aadhar Updation Extended: नागरिकांना दिलासा! मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढली

Updated on 16-Jun-2023
HIGHLIGHTS

ऑनलाईन Aadhar कार्ड मोफत अपडेट करण्याच्या बाबतीत नागरिकांना दिलासा

मुदतवाढ झाली असून ही तारीख 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ऑनलाईन आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी आणखी तीन महिन्यांच्या कालावधी

Aadhar Updation Extended: ऑनलाईन Aadhar कार्ड मोफत अपडेट करण्याच्या बाबतीत नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खरं तर, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. यापूर्वी यासाठीची अंतिम तारीख 14 जून होती. मात्र, यात मुदतवाढ झाली असून ही तारीख 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

मात्र हे लक्षात घ्या की, ज्यांनी गेल्या 10 वर्षांत एकदाही आधार कार्ड अपडेट केले नाही, अशा नागरिकांना आधार प्राधिकरणाने आधार अपडेट करणे बंधनकारक  केले आहे. UIDAI ने लास्ट अपडेशन डेट वाढवत नागरिकांना यासाठी तीन महिन्यांच्या कालावधी दिला आहे.  


आधार मोफत ऑनलाइन अपडेट करा.

 कोणताही आधारधारक आपले कार्ड मोफतमध्ये ऑनलाईन पद्धतीने अपडेट करू शकतो. आधार पोर्टलद्वारे मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ऑनलाइन अपडेट केला जाऊ शकतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. दुसरीकडे, तुम्ही हे काम आधार क्रमांकावर जाऊन केले तर यासाठी 50 रुपये शुल्क आहे.

ऑनलाईन आधार अपडेट करण्याची प्रक्रिया

ऑनलाईन आधार अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या https://uidai.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा. आता  तुम्हाला myAadhaar चा पर्याय दिसेल तयार 'अपडेट आधार' विभागात जा. यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड विचारले जाईल. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर OTP येईल आणि त्यानंतर पडताळणी केली जाईल.

आता तुम्हाला पत्ता, फोन नंबर किंवा जन्मतारीख यांचा तपशील द्यावा लागेल. काही दस्तऐवजांच्या हार्ड कॉपीही अपलोड कराव्या लागतील. अखेर आता 'कन्फर्म आणि सबमिट' बटणावर क्लिक करा. यासह तुमचे आधार कार्ड स्वयंचलितपणे अपडेट केले जाईल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :