गेल्या वर्षी पासून Aadhar Card ऑनलाईन मोफतमध्ये अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, आता अखेर Aadhar Card मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. होय, डिसेंबर 2023 मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान (UIDAI) ने Aadhar मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली होती. मोफतमध्ये अपडेट करण्यासाठी 14 मार्च 2024 ही नवीन मुदत ठेवण्यात आली होती. ही मुदत आता अवघ्या पुढील आठवड्यामध्ये संपुष्टात येणार आहे.
हे सुद्धा वाचा: How to: युजर्ससाठी Good News! Flipkart UPI सेवा भारतात लाँच, ‘अशा’प्रकारे चुटकीसरशी ऍक्टिव्ह करा
म्हणजेच, सध्या नागरिक केवळ myAadhaar पोर्टलवर त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकतात. मात्र, जर आपण ते ऑफलाइन अपडेट केले तर, आपल्याला एकूण 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
Aadhar Card धारक 14 मार्चपर्यंत UIDAI वेबसाइटवरून त्यांचे नाव, पत्ता, फोटो आणि Aadhar Card मधील इतर गोष्टी मोफतमध्ये अपडेट करू शकतात. वर सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये गेलात तर तुमच्या आधार कार्डचे तपशील अपडेट करण्यासाठी तुमच्याकडून 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
मोफत तुमचे आधार कार्ड अपडेट करणे अगदी सोपे आहे. फक्त पुढीलप्रमाणे सर्व माहिती स्टेप्स बाय स्टेप फॉलो करा:
‘अशा’प्रकारे वरील सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही आधार कार्ड अपडेट साठी रिक्वेस्ट करू शकता. पण ही प्रक्रिया वाचल्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल की, ऍड्रेस प्रूफ कसा अपलोड करावा. तर, त्याबाबत देखील तुम्ही काळजी करू नका. ऍड्रेस प्रूफ अपलोड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे: