Flipkart बिग सेव्हिंग डेज सेलसह विविध प्रोडक्ट्सवर मिळेल सूट, बघा डिटेल्स

Updated on 01-May-2023
HIGHLIGHTS

Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल सुरु होणार

5 मे पासून 10 मे पर्यंत सेल सुरु असेल.

फ्लिपकार्टने ग्राहकांना स्टोअरमध्ये काय आहे याची झलक दाखवली

Flipkart लवकरच त्याच्या लोकप्रिय बिग सेव्हिंग डेज सेलसह विविध प्रोडक्ट्सवर सूट देणार आहे. हा सेल 5 मे पासून सुरू होऊन 10 मे पर्यंत सुरु असणार आहे. फ्लिपकार्ट प्लस वापरणाऱ्यांसाठी हा सेल एक दिवसाआधी म्हणजेच 4 मे पासून सुरू होईल. या सेलमध्ये स्मार्टफोनपासून ते गॅजेट्सपर्यंत आकर्षक ऑफर्स मिळतील.

सेलपूर्वी, फ्लिपकार्टने ग्राहकांना स्टोअरमध्ये काय आहे याची झलक दाखवली आहे. त्यानुसार, iPhone 13 आणि Samsung S21 FE 5G वर खूप मोठी डील मिळेल, असे दिसून आले आहे. हे स्मार्टफोन्स आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. 

Samsung S21 FE 5G वरील ऑफर्स

 Samsung S21 FE 5G कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या प्रीमियम सॅमसंग स्मार्टफोनची मूळ किंमत 74,999 रुपये आहे. परंतु तुम्हाला फ्लिपकार्टवरून 26% सूट देऊन 54,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळतेय. हा स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

iPhone 13 वरील ऑफर्स

iPhone लव्हर्ससाठी फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोन्स स्वस्तात मिळणार आहे. या सेलमध्ये iPhone 13 ची किंमत 50,000 पेक्षा कमी किमतीत असू शकतो. ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी ठरेल. अशा परिस्थितीत कमी किंमतीत iPhone 13 खरेदी करणे तुमच्यासाठी परवडणारा सौदा ठरणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :