Flipkart Big Savings Day sale : फ्लिपकार्टची सर्वात मोठी सेल ‘या’ दिवशीपासून होणार सुरु, पहा सर्वोत्तम डिल्स
Flipkart Big Savings Day sale ची घोषणा
सेल 23 जुलैपासून ते 27 जुलैपर्यंत चालेल
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल
Flipkart या महिन्याच्या शेवटी Big Savings Day sale आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. हा फ्लिपकार्ट सेल 23 जुलैपासून सुरू होणार आहे. या सेलदरम्यान तुम्ही विविध स्मार्टफोन्स, वेअरेबल, लॅपटॉप इत्यादींवर सर्वोत्तम डील आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. हा सेल 23 जुलैपासून सुरू होईल आणि 27 जुलैपर्यंत चालेल. Amazon India चा Amazon प्राइम डे सेल 23 जुलैपासून सुरू होईल. मात्र, तो फ्लिपकार्टपेक्षा कमी दिवस असणार आहे.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Tecno ने आणला 11 GB RAM असलेला मजबूत फोन, किंमत 9.5 हजार रुपयांपेक्षा कमी
Flipkart ने आधीच Oppo Reno 5 Pro, iPhone 11 आणि Moto G31 वर ऑफर टीज केले आहेत. यासह, ई-कॉमर्स वेबसाइट सेलची तारीख जवळ आल्यावर आणखी डील आणि ऑफर जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. फ्लिपकार्ट सेल 2022 मध्ये तुम्हाला Vivo, Oppo, Motorola आणि Apple स्मार्टफोन्सवर उत्तम डील मिळू शकतात.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट
याशिवाय फ्लिपकार्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देखील असेल. ग्राहक हेडफोन आणि स्पीकर 70 सूट % देऊन खरेदी करू शकतात. त्याबरोबरच, राउटर, कीबोर्ड इत्यादी संगणक उपकरणांची किंमत 99 रुपयांपासून सुरू होईल.
फ्लिपकार्टने देखील पुष्टी केली आहे की, ते सेल दरम्यान टॅब्लेटवर 45 % सूट आणि अधिक ऑफर करणार आहेत. याशिवाय, स्मार्टवॉचवर 65 % पर्यंत सूट मिळेल. सेल दरम्यान ग्राहकांना टीव्ही आणि उपकरणांवर 70 % सूट देखील मिळेल.
फ्लिपकार्ट प्लसच्या ग्राहकांनाही सर्वोत्तम ऑफर आणि डिस्काउंट डील मिळण्याची शक्यता आहे. कंपनी सेल दरम्यान तुम्हाला सकाळी 12 वाजता, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता नवीन डील देखील मिळणार आहेत. ग्राहक काही बँक ऑफर देखील क्लब करू शकतील, जे अतिरिक्त सवलत ऑफर करतील. त्यानंतर तुमच्यासाठी या ऑफर आणखी आकर्षक होणार आहेत. तुम्हाला काही प्रोडक्ट्सवर नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile