फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल उद्यापासून म्हणजेच 10 जूनपासून सुरू होत आहे.
या सेलमध्ये निवडक बँक कार्डवर सूट उपलब्ध आहे.
Flipkart Originals वर 80% सूट मिळण्याची शक्यता आहे.
ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने आगामी Flipkart Big Saving Days Sale ची घोषणा केली आहे. यासाठी वेबसाईटवर एक पेज लाईव्हही करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल उद्यापासून म्हणजेच 10 जूनपासून सुरू होत आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 10 जून 2023 च्या मध्यरात्री 12 वाजतापासून सुरू होणार आहे. तर हा सेल 14 जून 2023 पर्यंत चालेल. बघुयात या सेलमध्ये कोणते डिस्कॉऊंटसह प्रोडक्ट्स मिळतील.
बँक कार्डवर उपलब्ध ऑफर्स
या सेलमध्ये निवडक बँक कार्डवर सूट उपलब्ध आहे. सेल अंतर्गत, HDFC, SBI आणि Kotak Bank च्या कार्डवर 10-10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे.
इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स वर मोठी सूट
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू 80% सूट देऊन खरेदी करता येतील. याबरोबरच, सेल दरम्यान टीव्ही आणि अप्लायन्सेसच्या सेलमध्ये 75% पर्यंत सूट दिली जाईल. यासह टॉप वॉशिंग मशीनवर 55% पर्यंत सूट आणि रेफ्रिजरेटरवर 60% पर्यंत सूट उपलब्ध असणार आहे.
याव्यतिरिक्त, Flipkart Originals वर 80% सूट आहे. ग्राहक सवलतीसह Realme, Redmi, Apple आणि Vivo स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम असाल. वेबसाइट लवकरच स्मार्टफोन्सवरील ऑफर लाइव्ह करणार आहे. याशिवाय, सेलमध्ये बाइक आणि स्कूटर्सवर 10,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.