प्रतीक्षा संपली ! Flipkart Big Saving Days Sale सुरु, ‘या’ प्रोडक्ट्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट

प्रतीक्षा संपली ! Flipkart Big Saving Days Sale सुरु, ‘या’ प्रोडक्ट्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट
HIGHLIGHTS

Flipkart Big Saving Days Sale आजपासून सुरु

फ्लिपकार्टचा सेल 11 मार्च ते 15 मार्चपर्यंत चालेल.

Apple iPhone 14 ऑफर

Flipkart या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Flipkart Big Saving Days Sale सुरु झाले आहे. यात युजर्सना वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. या सेलमध्ये अगदी कमी किमतीत iPhone 14 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. वापरकर्ते 17 टक्के सवलतीसह सुमारे 65,999 रुपयांमध्ये iPhone 14 खरेदी करू शकतील. फ्लिपकार्टचा सेल 11 मार्च ते 15 मार्चपर्यंत चालेल. बघुयात डिल्स… 

हे सुद्धा वाचा : प्रत्येकाला परवडणारा JIO प्लॅन! 84 दिवसांच्या वैधतेसह मोफत कॉलिंग, डेटा आणि बरेच काही…

फ्लिकर्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, कपडे, भांडी, फूटवेअर, फर्निचर अशा अनेक प्रकारच्या प्रोडक्ट्सवर बंपर सवलत उपलब्ध आहे. याशिवाय वापरकर्ते ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट आणि EMI सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 

सेलदरम्यान उपलब्ध निवडक डिल्स 

 म्युझिक इक्विपमेंट्स इत्यादींवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. एअर कूलरवर 45 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. किचन इलेक्ट्रॉनिक्सवर 60% पर्यंत सूट मिळेल. 

कीबोर्डच्या खरेदीवर 15 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. नथिंग फोन (1) फ्लिपकार्ट सेलमध्ये फक्त रु.25,000 मध्ये उपलब्ध असेल. तुम्ही Google Pixel 7 देखील 59,999 रुपयांऐवजी 50,000 रुपयांना खरेदी करू शकता. असेच इतरही जबरदस्त डिल्स तुम्हाला मिळणार आहेत. 

Apple iPhone 14 ऑफर

Apple iPhone 14 चे 128GB मॉडेल 17 % डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यूजर्स हा फोन जवळपास 65,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास 20,000 रुपयांपर्यंतची बचत होईल. कंपनी iPhone 14 वर 1 वर्षाची वॉरंटी आणि इन-बॉक्स ऍक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी देत ​​आहे. वापरकर्ते पर्पल, ब्लु, मिडनाईट आणि स्टारलाइट कलर ऑप्शनमध्ये फोन खरेदी करू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo