Flipkart Big Billion Days Sale 2023 लवकरच होणार सुरु, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळेल प्रचंड Discount

Updated on 27-Sep-2023
HIGHLIGHTS

Flipkart Big Billion Days Sale 2023 लवकरच फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे.

Flipkart वर Flipkart Big Billion Days sale साठी मायक्रोसाइट लाइव्ह

सेल दरम्यान लेटेस्ट स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट आणि पहिली विक्रीदेखील सुरु होणार आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2023 लवकरच फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. सेलदरम्यान, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलतींसह स्मार्टफोन खरेदी केले जाऊ शकतात. अलीकडेच, बिग बिलियन डेज सेलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आणि लेटेस्ट स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग, मोटोरोला, शाओमी, विवो सारखे स्मार्टफोन या सेलमध्ये ऑफर्स आणि आकर्षक डिस्काउंटसह समाविष्ट केले जातील.

Flipkart वर Flipkart Big Billion Days sale साठी मायक्रोसाइट लाइव्ह देखील केले आहे. यामध्ये स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनची यादी जाहीर करण्यात आली आहे. किंमती अद्याप पूर्णपणे उघड झाल्या नसल्या तरी हिंट नक्कीच दिले आहेत.

#image_title

Amazon वर देखील ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची घोषणा करण्यात आली आहे. कथित फ्लिपकार्ट सेल देखील Amazon सेलच्या बरोबरीने सुरु होणार आहे. मात्र, दोन्ही प्लॅटफॉर्मने अद्याप विक्रीची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. जर तुम्हाला फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर उपलब्ध होणारी डील्स बघू शकता.

लेटेस्ट स्मार्टफोन्सवर प्रचंड Discount

Flipkart Big Billion Days सेल दरम्यान लेटेस्ट स्मार्टफोन्स Samsung Galaxy F13, Moto G32, Vivo V29e, Poco M5, Realme 11x 5G, Infinix Hot 30 5G, Redmi Note 12, Realme 10 Pro 5G, आणि Moto G14 सारख्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, लोकप्रिय स्मार्टफोन्स म्हणजेच Nothing Phone 1, Samsung Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5, Google Pixel 7, आणि Oppo Reno 10 Pro 5G सारखे फोन डिस्काउंटसह खरेदी केले जाऊ शकतात.

सेलदरम्यान ‘या’ स्मार्टफोन्सची पहिली सेल

सेल दरम्यान Motorola Edge 40 Neo, Vivo T2 Pro 5G, Pixel 8, Vivo V29 आणि Samsung Galaxy F34 5G या नावांचा समावेश आहे. 27 सप्टेंबरपासून सेल प्राईस लाइव्ह ऑफर सुरू होणार आहे, ज्यामध्ये ग्राहक सेल सुरू होण्यापूर्वीच काही प्रोडक्ट्स सेल किमतीत खरेदी करू शकतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने मायक्रोसाइटवर 10 स्मार्टफोन्सची यादी जारी केली आहे. ज्यांच्या तारखा देखील एकामागून एक नमूद केल्या आहेत. या फोनच्या किमती दिलेल्या तारखेलाच जाहीर केल्या जाणार आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :