Revealed! Flipkart Big Billion Days Sale ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी सर्वात स्वस्त मिळणार स्मार्टफोन्स। Tech News
Flipkart Big Billion Days Sale 8 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल आणि 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल.
Apple फोनच्या ऑफर 1 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येतील.
Samsung फोनवर उपलब्ध ऑफर 3 ऑक्टोबर रोजी जाहीर होतील.
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Flipkart Big Billion Days Sale ची चाहते म्हणजेच ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने या सेलची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, आता कंपनीने या सेलची तारीखही जाहीर केली आहे. फ्लिपकार्टवर या वर्षातील ही सर्वात मोठी सेल आहे. वेबसाइटवर विक्रीसाठीचे एक पेजही लाईव्ह करण्यात आले आहे.
Flipkart Big Billion Days Sale ‘या’ दिवशी होणार सुरु
Flipkart Big Billion Days Sale 8 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल आणि 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल. म्हणजेच ग्राहक संपूर्ण एक आठवडा या सेल ऑफरचा लाभ घेऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, कमी किमतीत चांगला हँडसेट विकत घेण्यासाठी अनेक लोक नवीन स्मार्टफोन घेण्यासाठी या सेलची वर्षभर वाट पाहत असतात.
कधी मिळणार स्मार्टफोनवरील ऑफर्स?
फ्लिपकार्ट पेजनुसार तुम्हाला वर्षातील सर्वात कमी किमतीत लेटेस्ट स्मार्टफोन्स खरेदी करता येतील. Apple फोनच्या ऑफर 1 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येतील. Samsung फोनवर उपलब्ध ऑफर 3 ऑक्टोबर रोजी जाहीर होतील. तसेच, Realme च्या आणि Poco च्या स्मार्टफोन्सवरील ऑफर्स अनुक्रमे 6 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबर रिव्हिल होतील. Google Pixel 7 आणि Nothing Phone (1) सारख्या अनेक स्मार्टफोन्सच्या विक्री किमती उघड झाल्या देखील आहेत. तुम्ही हे फोन कमी किमतीत खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवरील ऑफर्स
इलेक्ट्रॉनिक्स आणि ऍक्सेसरीजवर 50-80% सूट असेल. तर, बेस्ट सेलिंग टॅबलेट 70% सवलतीसह खरेदी करण्याची संधी असेल. त्याबोबरच, मॉनिटर्सवर देखील 70% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही आणि अप्लायन्सेसच्या सेलमध्ये 80% पर्यंत सूट दिली जाईल. टॉप 4K स्मार्ट टीव्हीवर 75% पर्यंत सूट आणि रेफ्रिजरेटरवर 70% पर्यंत सूट मिळेल.
इतर प्रोडक्ट्सवरील ऑफर्स
Flipkart च्या सर्वात मोठ्या सेलमध्ये तुम्ही 60-90 % पर्यंत सूटसह फॅशन आयटम्स खरेदी करू शकता. कंपनी ब्युटी आणि स्पोर्ट्स प्रोडक्ट्सवर 60-80% पर्यंत सूट देणार आहे. तसेच, फर्निचरवर 85% पर्यंत सूट, खाद्यपदार्थांवर 79% पर्यंत सूट मिळेल. विशेषतः फ्लाइट तिकीट आणि हॉटेल बुकिंगवरही सवलत असणार आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile