Flipkart Big Billion Days Sale 2022 : इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर 80% पर्यंत सूट, ‘या’ दिवशी सुरू होईल सेल

Updated on 07-Sep-2022
HIGHLIGHTS

Flipkart Big Billion Days Sale 2022 ची घोषणा

इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार

Infinix कडून बंपर डिस्काउंट

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkartने आपल्या Flipkart Big Billion Days Sale 2022 ची घोषणा केली आहे. हा सेल 11 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सेलमध्ये, स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, हेडफोन्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सेलमध्ये ICICI बँक आणि Axis बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डसह केलेल्या खरेदीवर 10 टक्के पर्यंत त्वरित सूट देखील मिळणार आहे. सेलमध्ये डिस्काउंटसोबतच भारी एक्सचेंज ऑफरही असणार आहेत.

हे सुद्धा वाचा : Akshay Kumar : फ्लॉप हॅटट्रिकनंतर अक्षयच्या 'या' चित्रपटाला IMDB वर मिळाले सर्वाधिक रेटिंग

'या' प्रोडक्ट्सवर प्रचंड सूट

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Realme, Poco, Vivo आणि Samsung सोबत iPhone देखील मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि ऍक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. या सेलमध्ये बेस्ट सेलिंग ट्रिमरवर 75 टक्के सूट आणि गेमिंग लॅपटॉपवर 40 टक्के सूट मिळेल. 

तसेच प्रिंटर, मॉनिटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर 80 टक्के सूट मिळेल. त्याबरोबरच, टॉप सेलिंग ब्रँडचे TV 8,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. या फ्लिपकार्ट सेलमध्ये, मोबाईल केस आणि स्क्रीन गार्ड्स फक्त रु.99 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येतील.

Infinix कडून बंपर सूट

सेलमध्ये तुम्हाला Infinix चे TV, लॅपटॉप, मोबाईल तसेच इतर ऍक्सेसरीजवर प्रचंड सूट मिळेल. यासोबतच, कंपनी बजाज फिनसर्व्ह आणि फ्लिपकार्ट सुपर कॉईनसह नो-कॉस्ट EMI सुविधा देखील देणार आहे. सेल दरम्यान कंपनीच्या स्मार्टफोनवर 250 रुपयांची झटपट सूट मिळेल. यासोबतच ग्राहकांना 3 लाखांपर्यंतचे स्मार्टफोन जिंकण्याची संधीही मिळणार आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :