Flipkart वर लवकरच येतेय नवी सेल, प्रोडक्ट्सवर मिळणार तब्बल 80% पर्यंत सूट ?

Flipkart वर लवकरच येतेय नवी सेल, प्रोडक्ट्सवर मिळणार तब्बल 80% पर्यंत सूट ?
HIGHLIGHTS

lipkart वर लवकरच Big Bachat Dhamaal Sale सुरु होणार

सेल उद्यापासून म्हणजेच 19 मे 2023 पासून सुरू होईल

लाइफस्टाइल प्रोडक्ट्सवर देखील 80% पर्यंत सूट

अलीकडेच, Flipkart वर बिग सेविंग डेज सेलचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ज्या ग्राहकांना या सेलचा लाभ घेता आले नाही, त्यांनी हताश होण्याची गरज नाही. कारण Flipkart वर लवकरच Big Bachat Dhamaal Sale सुरु होणार आहे. कंपनीने यासाठी एक पेज देखील लाईव्ह केले आहे. ज्यामध्ये सेल डेट आणि ऑफर्स उघड करण्यात आले आहेत. सेलदरम्यान स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसोबतच खाद्यपदार्थ आणि कपड्यांवरही सूट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना एक लाखाहून अधिक प्रोडक्ट्सव 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

Flipkart Big Bachat Dhamaal Sale तारीख आणि ऑफर्स  

हा बचत धमाल सेल उद्यापासून म्हणजेच 19 मे 2023 पासून सुरू होईल आणि 21 मे 2023 पर्यंत चालेल. सेल संपूर्ण तीन दिवस चालणार आहे. सेलदरम्यान 1000 हून अधिक ब्रँड्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. 

डिल्स :  

धमाल डील अंतर्गत नवीन डील 12 AM, 8 AM आणि संध्याकाळी 4 वाजता येतील. लूट बाजारातील वस्तू दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत सर्वात कमी किमतीत उपलब्ध असतील. एवढेच नाही तर या सेल अंतर्गत कॉम्बो डील्स मध्यरात्री 12, सकाळी 8 आणि संध्याकाळी 4 वाजता लाईव्ह होतील. 

स्मार्टफोन्सवरील डील्स :

या सेलमध्ये Realme, iPhone, Poco आणि Samsung सह अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनवर सूट दिली जाईल. स्मार्टफोन्सवरील डील्स अद्याप उघड झाले नाही. सध्या पेजवर 'Reveal Soon' असे लिहून ऑफर येत आहे. 

लाइफस्टाइल प्रोडक्ट्सवर 80% सूट 

सेल अंतर्गत स्पोर्ट्स आणि फिटनेसवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तसेच, कपड्यांवर 60-90% पर्यंत सूट असेल. तसेच, सेलमध्ये 60-70 शूजवर 60-80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo