Lovely Professional University (LPU) च्या जवळपास 300 विद्यार्थ्यांनी मिळून एक सोलर पावर्ड ड्रॉयव्हरलेस स्मार्ट बस तयार केली आहे. याचा खुलासा Indian Science Congress (ISC) च्या 106व्या आवृत्तीत केला गेला आहे. जलंधर मध्ये गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उदघाटन केले. या स्मार्ट बसची किंमत 6 लाख असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हि बस पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे आणि फक्त रिन्यूएबल एनर्जीचा वापर करते . LPU चॅन्सलर अशोक मित्तल म्हणतात कि बस मध्ये येत्या काळात अजून फीचर्स पण देण्यात येतील जेणेकरून हि सामान्य माणसांसाठी पूर्णपणे इकोफ्रेंडली बनेल.
बोलले जात आहे कि नरेंद्र मोदी या ड्राइवरलेस सोलर बस ने प्रवास करू शकतात पण याची पुष्टि अजून झाली नाही. LPU च्या सीएसई आणि मेकॅनिकल इंजीनियरिगच्या विद्यार्थ्यांनी हि दोन वर्षात बनवली आहे. 30 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या या बस मध्ये लागलेल्या आधुनिक सेंसरमुळे बस दुर्घटनाग्रस्त होणार नाही. या बसची खासियत पाहता हिची उंची आठ फूट आहे. तसेच हिचे वजन 1500 किलो आहे. तर बसची रुंदी 5 फूट आणि लांबीही 12 फूट आहे.
या सोलर बस मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. हि बस मोबाईल फोन वरून चालवता आणि ऑपरेट करता येईल. IP एड्रेस च्या आधुनिक टेक्नॉलॉजीने बस कनेक्टड राहील. GPS आणि Bluetooth सोबत पण बस कनेक्ट केली जाऊ शकते. रस्त्यात एखादा अडथळा किंवा दुर्घटना झाली असल्यास बस मधील सेंसर तिचे डायरेक्शन चेंज करतील. तसेच बस थांबवू पण शकतात.