FASTag New Rules: आजपासून नवीन नियम लागू! निष्क्रियता टाळण्यासाठी लवकरात लवकर करावे लागेल ‘हे’ काम
FASTag युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे.
1 ऑगस्ट 2024 पासून NPCI ने FASTag युजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.
FASTag वापरकर्त्यांना 31 ऑक्टोबर रोजी त्यांचे केवायसी तपशील अपडेट करावे लागतील.
वाहन चालक आणि FASTag युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2024 पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अपडेट केलेल्या KYC रिक्वायरमेंट्सवर लक्ष केंद्रित करून FASTag वापरकर्त्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. FASTag ही वाहनांसाठी प्रीपेड टॅग सुविधा आहे, जी टोल प्लाझावर फार वेळ थांबण्याचा त्रासापासून मुक्तता देते. मात्र, आजपासून FASTag च्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत.
Also Read:पॉवरफुल फीचर्ससह Motorola Edge 50 स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
FASTag च्या नियमांमध्ये बदल
KYC अपडेट: FASTag युजर्सना 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांचे KYC तपशील अपडेट करावे लागतील. विशेषतः जर त्यांचा फास्टॅग 3 ते 5 वर्षे जुना असेल.
जुने FASTags बदलणे: कोणताही FASTag जो 5 वर्षांपेक्षा जुना आहे, तो बदलणे आवश्यक आहे.
वाहनाचा तपशील लिंक करणे: वाहन नोंदणी क्रमांक आणि चेसिस क्रमांक FASTag शी लिंक असावेत.
नवीन वाहनाचे रजिस्ट्रेशन अपडेट: नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना त्यांचा FASTag वाहन नोंदणी क्रमांकासह 90 दिवसांच्या आत अपडेट करावा लागेल.
डेटाबेस व्हेरिफिकेशन: FASTag प्रोव्हाइडर्सना आपापल्या डेटाबेसची पडताळणी करावी लागेल.
फोटो अपलोड: ओळख आणि सुरक्षिततेसाठी, FASTag प्रदात्यांना आता वाहनाच्या पुढील आणि बाजूचे स्पष्ट, हाय कॉलिटीचे फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
मोबाईल नंबर लिंक: अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आणि वेळेवर अपडेट्स प्राप्त करण्यासाठी प्रत्येक FASTag ला मोबाईल नंबरशी लिंक करणे, बंधनकारक आहे.
जवळपास 98% आणि 8 कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह, FASTag ने देशाच्या इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टममध्ये परिवर्तन केले आहे. FASTag शी लिंक केलेल्या खात्यातून थेट टोल पेमेंट करण्यासाठी ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञान वापरते. वापरकर्ते टोल प्लाझा, ‘इंडिया ऑइल’ चे पेट्रोल पंप, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, बँक, पेटीएम आणि Amazon वरून FASTag खरेदी करू शकतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile