मनोरंजन क्षेत्रात सध्या चित्रपट आणि TV मालिकांपेक्षा वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच, अनेक भारतीय वेब सिरीज रिलीज झाल्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. आज आम्ही अशाच काही वेब सीरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही नक्की बघायला पाहिजे. या वेब सिरीज संपूर्ण मनोरंजकी आहेत. त्याबरोबरच, या वेब सिरीज तुम्हाला देसी टचमध्ये गुंतवून ठेवतात.
मिर्झापूर
ऍमेझॉन प्राईमवरील वेब सिरीज मिर्झापूरची देसी स्टाईल, टिपिकल देसी कॅरेक्टर आणि फनी वनलाइनमुळे ती देशभरात लोकप्रिय वेब सिरीज बनली आहे. कलेन भैय्यापासून मुन्ना भैय्यापर्यंत सर्वच पात्रांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. या मालिकेत पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू शर्मा यांनी जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे.
पंचायत
पंचायत सिरीजचा दुसरा सीझनही ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर गेल्या महिन्यात रिलीज झाला आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनलाही चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. जितेंद्र कुमार, रघुबीर यादव आणि नीना गुप्ता सारखे अनुभवी कलाकार या सिरीजमध्ये दिसत आहेत.
हे सुद्धा वाचा : हे '5' 43 इंच स्मार्ट TV निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध, सर्वात स्वस्त फक्त 8,999 रुपये
पाताल लोक
Amazon Prime Video ची ही वेब सिरीज सर्वाधिक पाहिली जाणारी सिरीज ठरली आहे. या मालिकेची कथा दिल्ली पोलिसच्या इन्स्पेक्टर 'हाथीराम चौधरी'बद्दल आहे. मालिकेचा पुढचा सीझन लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे.
द फॅमिली मॅन
Amazon Prime Video ची ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीज आहे. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित मनोज बाजपेयी यांची ही सिरीज लोकांना खूप आवडली आहे. फॅमिली मॅन 3 2022 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.