सिनेरसिकांसाठी मनोरंजनाने भरपूर असेल नवे वर्ष! ‘हे’ प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्स OTTवर पदार्पणासाठी सज्ज

Updated on 30-Dec-2022
HIGHLIGHTS

2023 मध्ये बॉलीवूडचे दिग्गज कलाकार OTTवर पदार्पण करणार

करीन कपूर खान ते काजोलपर्यंत अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

नवीन वर्षात कोणते वेब सिरीज प्रदर्शित होणार ते बघुयात...

2022 मध्ये, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. माधुरी दीक्षित ते अजय देवगण आणि सुनील शेट्टी सारख्या स्टार्सनी OTT पदार्पण केले आहे. आता 2023 हे वर्ष येणार आहे. येत्या वर्षात आणखी काही स्टार्स त्यांच्या OTT पदार्पणासाठी सज्ज आहेत. ओटीटी वेब सीरिजवर नवीन वर्षात इतर कोणते मोठे स्टार पदार्पण करणार आहेत, ते बघुयात… 

हे सुद्धा वाचा : Jio 5G : या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू, 'अशा' प्रकारे मिळेल वेलकम ऑफर

काजोल – द गुड वाईफ

रेणुका शहाणे दिग्दर्शित 'त्रिभंगा' या चित्रपटाद्वारे OTT मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री काजोल 2023 साली अमेरिकन कोर्टरूम ड्रामा मालिका 'द गुड वाईफ' या नवीन वर्षात हिंदी रिमेकद्वारे वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार आहे. सुपरण वर्मा या सिरीजचे दिग्दर्शन करत आहे. यामध्ये काजोलशिवाय कुब्बरा सैत, शीबा चड्ढा, आमिर अली दिसणार आहेत. या मालिकेत काजोलने एका गृहिणीची भूमिका केली आहे, जी 13 वर्षांनंतर पती तुरुंगात गेल्यावर आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लॉ फर्ममध्ये कामावर परतते. ही मालिका डिजनी + हॉटस्टारवर प्रसारित होईल.

उर्मिला मातोंडकर – तिवारी

पूर्वीची बिंदास बाला उर्मिला मातोंडकर 'तिवारी' या वेब सीरिजद्वारे OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. आई आणि मुलीच्या भावनिक नात्यावर आधारित ही थ्रिलर मालिका आहे. या मालिकेची कथा एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन सौरभ वर्मा करत आहेत. आत्तापर्यंत, ही मालिका कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येईल याविषयी प्रॉडक्शन टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

करीना कपूर खान – डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स

 करीना कपूर 'Devotion of Suspect X' द्वारे OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. हा शो जपानी लेखक केगो हिगाशिनो यांच्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या कादंबरीवर आधारित आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित, या मालिकेत करीना कपूर खान, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रवाहित होतील.

सोनाक्षी सिन्हा – दहाड

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा देखील रीमा कागती दिग्दर्शित 'दहाड' या वेब सिरीजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. ही मालिका Amazon Prime Video वर स्ट्रीम होईल. या मालिकेत सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकारी अंजली भट्टची भूमिका साकारत आहे. या मालिकेत सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि शिल्पा शेट्टी- इंडियन पोलीस फोर्स

करण जोहरने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटात लॉन्च केले. आता तो अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजद्वारे OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. आठ भागांच्या या मालिकेत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि शिल्पा शेट्टी हे दोघे पोलिसांच्या भूमिकेत आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन सुशांत प्रकाश यांनी केले आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :