फेसबुक लवकरच आणणार युनिवर्सल सर्च वैशिष्ट्य

फेसबुक लवकरच आणणार युनिवर्सल सर्च वैशिष्ट्य
HIGHLIGHTS

काही दिवसात हा वेब, अॅनड्रॉईड आणि IOS च्या ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. फेसबुकच्या ह्या अपडेटला एकत्र रोलआऊट करणार नाही, तर टप्प्याटप्प्याने ग्राहकांंना पाठवले जाईल.

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक लवकरच एक नवीन वैशिष्ट्य सादर करणार आहे. अजूनतरी फेसबुकने आपल्या ह्या नवीन फीचरला काही वेगळ नाव दिले नाही.  कंपनीचे हे फीचर जुन्या सर्चच्या अंतर्गतच असेल. परंतू सध्यातरी ह्यात सर्चसाठी इंग्रजी प्रमुख भाषा म्हणून काम करेल. जर ह्याच्या उपलब्धतेविषयी बोलायचे झाले तर, काही दिवसांतच हा वेब, अॅनड्रॉईड आणि IOS ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाईल. फेसबुकच्या ह्या अपडेटला एकत्र रोलआऊट करणार नाही, तर टप्प्याटप्प्याने ग्राहकांंना पाठवले जाईल.

 

ह्या नवीन वैशिष्ट्याअंतर्गत आता आपण त्या पेजलासुद्धा शोधू शकता,जे तुमचे फेसबुक मित्रांच्या यादीत नाही आहेत किंवा तुम्ही त्या पेजला लाइक केलेले नसेल. ह्या वैशिष्ट्याच्या माध्यमातून तुम्ही फेसबुकवर उपलब्ध असलेले एकूण २ ट्रिलियन पोस्ट शोधू शकता.

फेसबुकच्या ह्या नवीन फिचरच्या माध्यमातून सध्या इंटरनेटवर कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा होतेय, ह्यासंबंधी माहिती मिळेल. ह्याबाबतीत आतापर्यंत ट्विटर अव्वल स्थानी आहे. मात्र आता फेसबुकसुद्धा ह्या ट्रेंडला आपल्या पेजवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सर्च माध्यमातून यूजर न केवळ मोठ्या प्रमाणात फेसबुकवरील कोणत्या खास विषयावर शेअर केलेली बातमी बघू शकतील तर व्यक्तिगत आवड आणि लिंक शेअरसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. शोधण्याच्या बाबतीत तर फेसबुक आधीपासूनच सर्वांच्या पुढे आहे. सध्या तरी येथे १.५ दशलक्ष पेज दरदिवसा शोधले जातात. अशातच हे फीचर फेसबुकसाठी अजून सर्च जमवण्याचे काम करेल.

जवळपास एक वर्षाआधी सर्च फीचर सादर केले होते. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे एक-एक फेसबुक मित्र शोधण्यापेक्षा अगदी सहजरित्या ते शाधू शकता. एवढच नव्हे तर, जर तुम्ही कोणत्या विशेष पेजला लाइक केले असेल तर त्याचे अपडेट्स तुमच्या फेसबुक होम वर प्रतिक्षा न करता, सर्च माध्यमातून सरळ त्या कंपनीच्या फेसबुक पेजवर जाऊन अपडेट पाहू शकता.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo