ह्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मचे नाव ‘लोकल मार्केट’ असे आहे. यूजर ह्या प्लेटफॉर्मचा वापर ई-कॉमर्स वेबसाइट म्हणून करु शकतो.
सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुक लवकरच आपल्या यूजर्सला ऑनलाईन खरेदी आणि विक्रीसाठी एक प्लेटफॉर्म सादर करणार आहे. ह्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मचे नाव ‘लोकल मार्केट’ असे आहे. यूजर ह्या प्लेटफॉर्मचा वापर ई-कॉमर्स वेबसाइट म्हणून करु शकतो.
ही माहिती टेक क्रंचने दिली आहे, मिळालेल्या माहितीनुसार फेसबुकचा वापर करणा-या अनेक यूजर्सने अशी बातमी दिली होती की, त्यांच्या आयफोनच्या फेसबुक अॅपवर मेसेंजरच्या बटणाच्या जागेवर खूपच कमी वेळासाठी एक नवीन वैशिष्ट्य दिसून आले. ह्या नवीन वैशिष्ट्यामध्ये खरेदी आणि विक्री असे दोन प्रकार असतील. विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंची चित्रे आणि किंमतसुद्धा दिली जाईल.
सध्यातरी फेसबुक ‘लोकल मार्केट’ च्या नावाने खरेदी आणि विक्री च्या प्लेटफॉर्मचे परीक्षण करत आहे. सध्यातरी ते परीक्षणाअंतर्गत आहे, ज्याचा उद्देश खरेदीदार आणि विक्रेत्यांवर लक्ष केंद्रीत करणे आहे. ह्याच्या मदतीने उपयोगकर्ता अनेक प्रकारे उत्पादनांच्या विक्रीसाठी त्या प्लेटफॉर्मवर पोस्ट करु शकता.
हे वैशिष्ट्य लवकरच फेसबुक युजर्ससाठी सादर केले जाईल. त्यामुळे फेसबुक वापरणा-या लोकांना खूप फायदा होईल आणि ते फेसबुकचा वापर करुन ह्या शॉपिंगची मजा घेऊ शकतात. सध्यातरी फेसबुक युजर्सला शॉपिंगसाठी दुस-या शॉपिंग प्लेटफॉर्म्सवर जावे लागत आहे.