ह्यावरुन असेच दिसतेय की, हुआवे CES 2016 मध्ये आपले अनेक आकर्षक असे गॅजेट्स लाँच करण्यात व्यस्त आहे. ह्यात आतापर्यंत तीन स्मार्टफोन्स, दोन वेअरेबल आणि १ टॅबलेटचा समावेश आहे. ह्यातील घोषणा केलेले सर्वच गॅजेट्स नवीन नाही आहे. ह्यातील काही गॅजेट्स आपण याआधी पाहिले आहेत.
Huawei MediaPad M2 10.0
ह्या टॅबलेटला १० इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेला आहे. ह्या टॅबलेटला धातूमिश्रित अॅल्युमिनियमची पुर्ण मेटल बॉडी देण्यात आले आहे. हा डिवाइस दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे- 16GB आणि 64GB. ह्याला दोघांनाही आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. 16GB मध्ये 2GB रॅम आणि 64GB मध्ये 3GB रॅम देण्यात आली आहे. 16GB चे मॉडेल हे फक्त सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे आणि 64GB मॉडेल हे सोनेरी रंगात उपलब्ध आहे. ह्याच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ऑटो फोकससह आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 6660mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर ह्यात वायफाय 802.11 b/g/n/ac, ब्लूटुथ 4.0, GPS, एक्सेलेरोमीटर आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. हा टॅबलेट 7.35mm इतका पातळ आहे.
ह्यातील 2GB + 16GB वायफाय प्रकाराची किंमत डॉलर ३४९ (जवळपास २३,३०० रुपये) आणि 3GB रॅम आणि LTE प्रकाराची किंमत $469 (जवळपास ३१,५०० रुपये) आहे.
Huawei Elegant & Jewel
हुआवेने दोन स्मार्टवॉचेस सादर केले आहेत- हुआवे एलिगन्ट आणि हुआवे ज्वेल. ह्या दोघांचा तपशील हा हुआवेच्या इतर स्मार्टवॉचेससारखाच आहे. फरक फक्त इतकाच आहे की, ह्याचे लूक आणि डिझाईन थोडे वेगळे आहे. हुआवे एलिगन्ट वॉच रोझ गोल्ड प्लेटेट बॉडी देण्यात आली आहे. तर हुआवे ज्वेलच्या डायला ६८ Swarovski Zirconia देण्यात आला आहे. हुआवे एलिगन्ट $499 (३३,३०० रुपये) उपलब्ध करण्यात आला आहे आणि हुआवे ज्वेलची किंमत $599 (जवळपास ४०,००० रुपये) ठेवण्यात आली आहे. हा सर्वात आधी युएसमध्ये उपलब्ध केला जाईल. पण भारतातील लाँचबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गोल्ड रंगाचा नेक्सस 6P
नेक्सस 6P हा स्मार्टफोन सोनेरी रंगात उपलब्ध करण्यात आलेला आहे. ह्यात 32GB आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. 64GB च्या नेक्सस 6P ची किंमत ४३,९९९ रुपये आहे.
हुआवे मॅट 8
ह्यात ६ इंचाची FHD डिस्प्ले 2.5D कर्व्ह्ड ग्लाससह मिळत आहे. हा ह्या कंपनीचा पहिला असा डिवाइस आहे ज्यात किरिण 950SoC सह ऑक्टा-कोर CPU आणि माली T880MP4 GPU देण्यात आले आहे. ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
तसेच हा अॅनड्रॉईड मार्शमॅलो v6.0 चालतो. ह्यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्यातील 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजची किंमत CNY २,९९९ (जवळपास ३१,२०० रुपये), 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत CNY ३,६९९ (जवळपास ३८,५०० रुपये) आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत CNY ४,३९९(जवळपास ४५,८०० रुपये) ठेवण्यात आली आहे.
Huawei GX8
हुआवे GX8 विषयी माहित करुन घेण्यासाठी ह्यावर क्लिक करा.