जूनमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर नव्या वेब सिरीज आणि चित्रपटांचा आनंद घ्या, बघा यादी

जूनमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर नव्या वेब सिरीज आणि चित्रपटांचा आनंद घ्या, बघा यादी
HIGHLIGHTS

डिझनी प्लस हॉटस्टारवर येणार MS MARVEL

जूनमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजची यादी

नवीन कंटेंट Amazon Prime Video, Netflix, Disney Plus Hotstar आणि MX Player वर उपलब्ध.

तुम्ही ऍक्शन चित्रपटांचे किंवा सुपरहिरोचे किंवा ड्रामाचे चाहते असाल, तर या महिन्यात या सर्व प्रकारचे चित्रपट आणि वेब सीरिज OTT वर प्रदर्शित होणार आहेत. या लेखात आम्‍ही तुम्‍हाला जूनमध्‍ये रिलीज होणार्‍या चित्रपटांची आणि वेब सीरीजची नावे सांगणार आहोत. जे Amazon Prime Video, Netflix, Disney Plus Hotstar आणि MX Player इ. वर प्रदर्शित होणार आहेत. चला तर बघुयात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजची यादी…   

9 HOURS 

 यामध्ये अभिनेता तारक रत्न एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. अजय, विनोद कुमार, मधु शालिनी, रवि वर्मा, प्रीती असरानी, ​​अंकित कोय्या, ज्वाला कोटी आणि मोनिका रेड्डी या सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. वेब सिरीज 2 जून रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

AASHRAM 3

आश्रमच्या बहुप्रतिक्षित सीझन 3 चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. मुख्य अभिनेता बॉबी देओलने इंस्टाग्रामवर या शोचा ट्रेलर शेअर केला आहे. सीझनमध्ये सामील झालेल्या ईशा गुप्ताची ओळख मोहक म्हणून होते. हा सीझन 3 जून रोजी MX Player वर रिलीज होणार आहे. 

 हे सुद्धा वाचा : भारतात Samsung चा नवा 5G फोन लवकरच लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

MS MARVEL 

या MCU चित्रपटात इमान वेल्लानी मिस मार्वलची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 8 जून रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मिस मार्वल उर्फ ​​कमला खान ही एक गेमर आहे, जिचे स्वप्न कॅप्टन मार्वलसारखे बनण्याचे आहे. या चित्रपटात फरहान अख्तरही दिसणार आहे.

SHE SEASON 2 

SHE सीझन 2 17 जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिरीजमध्ये एक महिला पोलीस हवालदार ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करत आहे. आरिफ अली आणि अविनाश दास दिग्दर्शित या सिरीजला इम्तियाज अली यांनी प्रोड्युस केले आहे.

Qala 

Qala चित्रपटदेखील जून 2022मध्येच रिलीज होणार आहे. बाबिल खान आणि तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन अन्विता दत्त यांनी केले आहे. त्याबरोबरच, चित्रपट अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांनी प्रोड्युस केला आहे. चित्रपटाची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

रनवे 34 

रनवे 34 ची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात अजय देवगणने कॅप्टन विक्रांत खन्ना यांची भूमिका साकारली आहे, जो एक कुशल पायलट आहे. हा चित्रपट 24 जून रोजी Amazon Prime Video वर येणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo