T20 विश्वचषकाचे सामने बघा मोफत ! Disney + Hotstar चे सदस्यत्व घेण्याची गरज नाही, वाचा डिटेल्स

Updated on 31-Oct-2022
HIGHLIGHTS

Disney + Hotstar चे सदस्यत्व न घेता ICC मेन्सच्या T20 विश्वचषक बघा

क्रिकेटप्रेमींसाठी अगदी मोफतमध्ये मॅच बघण्याचा पर्याय

निवडक प्लॅन्समध्ये OTT प्लॅटफॉर्म सब्स्क्रिप्शनचा पर्याय उपलब्ध

ICC मेन्स T20 विश्वचषक क्रिकेट जगतातील चाहत्यांसाठी एक मोठे उत्सव आहे. त्यामुळे सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही स्पर्धा येत्या 13 नोव्हेंबर संपनार आहे. या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी नेत्रदीपक राहिली आहे. या विश्वचषकाचे सर्व सामने Star Network आणि Disney+ Hotstar वर लाईव्ह पाहता येतील. मात्र, जर तुम्हाला या OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व घ्यायचे नसेल, तर ही स्पर्धा अगदी मोफत पाहण्याचा पर्याय देखील आहे.

हे सुद्धा वाचा : FLIPKART वरून शॉपिंग महागणार, 'या' महत्त्वाच्या सुविधेसाठी द्यावे लागतील जास्त पैसे…

मोफत बघा भारत विश्वचषक स्पर्धा

विशेष म्हणजे टी-20 विश्वचषकातील भारताचे सामने DD Sports वर दाखवले जात आहेत. हे फ्री टू एअर चॅनल आहे आणि ते डीडी फ्री डिश, DTH किंवा इतर केबल नेटवर्कवरही पाहता येते. खुद्द नेटवर्कच्या वतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. यावर तुम्हाला मॅच बघण्यासाठी चॅनेलला पे करण्याची गरज नाही. 

निवडक रिचार्ज प्लॅन्समध्ये OTT प्लॅटफॉर्म सब्स्क्रिप्शनचा पर्याय उपलब्ध

Reliance Jio, Bharti Airtel आणि Vodafone-Idea द्वारे अशा अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स ऑफर केले जात आहेत, ज्यामध्ये Disney + Hotstar सब्स्क्रिप्शन विनामूल्य उपलब्ध आहे. या प्लॅनसह रिचार्ज केल्यानंतरही तुम्ही वर्ल्ड कपचे सर्व सामने सहज आणि थेट बघू शकता. हे प्लॅन 151 रुपयांपासून ते 3,000 रुपयांपेक्षा जास्त आहेत.

Disney + Hotstar सब्स्क्रिप्शन

तुम्हाला Disney + Hotstar चे सदस्यत्व घेऊन विश्वचषकातील भारताचे सामने पहायचे असतील तर ते सहज करता येईल. या प्लॅटफॉर्मच्या वार्षिक प्लॅन्सची किंमत 899 रुपयांपासून सुरू होते आणि प्रीमियम प्लॅन प्रति महिना 299 रुपयांपर्यंत जातो. मात्र, बेसिक प्लॅनसह, आपण मोठ्या स्क्रीनवर स्ट्रीमिंग करू शकत नाही, म्हणून अधिक पैसे खर्च करावे लागतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :