Emergency Alert! तुमच्या फोनवरही आली आहे का ‘ही’ आपत्कालीन सूचना? जाणून घ्या याचा अर्थ

Updated on 15-Sep-2023
HIGHLIGHTS

Emergency Alert System तपासण्यासाठी देशातील विविध भागातील स्मार्टफोन्सना मॅसेज मिळतोय.

हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये मिळतोय Emergency Alert

याबाबत माहिती दूरसंचार विभागाकडून 20 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

आज अनेकांना दूरसंचार विभागाकडून Emergency Alert मॅसेज आला आहे, तो पाहून काही लोक घाबरले. कारण, खरं तर हा मेसेज तुमच्या फोनवर येतो, तेव्हा तुमचा फोन विचित्रपणे व्हायब्रेट होऊन आवाज काढू लागतो. हा आवाज ऐकून अनेकांना धक्का बसला आणि अनेकांनी दूरसंचार विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक देखील केले आहे. नक्की प्रकरण काय? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवट्पर्यंत वाचा. 

नक्की प्रकरण काय?

खरं तर, अधिसूचना DoT ने चाचणी संदेश म्हणून पाठवली आहे. हे तुमच्या फोनवर पाठवले जात आहे, कारण या फिचरची चाचणी केली जात आहे. याचा अर्थ, देशातील विविध भागातील विविध स्मार्टफोन वापरकर्त्यांना Emergency Alert System तपासण्यासाठी हा मॅसेज मिळत आहे. 

हिंदी आणि इंग्रजीमध्ये मिळतोय Alert

हा मॅसेज देशातील वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या उपकरणांवर वेगवेगळ्या वेळी पाठवला जात आहे. भारतातील अनेक युजर्सना हा मेसेज 15 दिवसांपूर्वी मिळाला. हा मॅसेज हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये मिळत आहे. याचा अर्थ या दोन्ही भाषांमध्ये त्याची चाचणी केली जात आहे, ज्यामुळे इतर अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचे प्रकाशन होऊ शकते.

कोणत्याही Emergency च्या परिस्थितीत त्याची प्रसारण क्षमता (ब्रॉडकास्ट क्षमता) तपासण्यासाठी या मॅसेजची चाचणी केली जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, याबाबत माहिती दूरसंचार विभागाकडून 20 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?

खरं तर, कोणतेही गंभीर आणि संवेदनशील संदेश पाठवण्यासाठी या तंत्रज्ञानाची सरकारकडून चाचणी घेतली जात आहे. खरं तर, कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा सरकारकडून कोणतेही मोठे पाऊल उचलले गेल्यास त्याची माहिती या अलर्टद्वारे मिळणार आहे. कोणताही मॅसेज लोकांपर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी या फीचरची तपासणी करण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. 

आम्ही तुम्हाला सांगतो की, सेल ब्रॉडकास्टचा वापर सामान्यतः कोणत्याही मोठ्या आपत्तीच्या वेळी लोकांना संदेश पाठवण्यासाठी केला जातो. जसे की, लोकांना हवामानाची माहिती देणे, त्सुनामीची माहिती, फ्लॅश फ्लड किंवा भूकंपाची माहिती देखील याद्वारे लोकांना दिली जाऊ शकते. ही सेवा जवळपास 20 देशांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :